पिंपरी : ३३ मावळ लोकसभा मतदार संघ, 206 (अ.जा.) पिंपरी विधानसभा मतदार संघ, श्री. संदीप खोत, मतदार नोंदणी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजीत करण्यात येत आहेत.
सन 2014 चे लोकसभा व विधानसभेचे मतदान टक्केवारी अतिशय कमी आहे. त्यात वाढ करण्यासाठी तसेच लोकशाही समृद्ध व बळकट करणेकरीता मतदानाच्या टक्केवारीत वाढ होणेसाठी तसेच १००% मतदारांनी मतदान करणेकरीता निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच भाग म्हणुन दि. 21/04/2019 रविवार रोजी सकाळी ६.30 वाजता सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. त्यानुसार पिंपरी विधानसभा क्षेञामध्ये सायकल रॅली काढण्यात येणार आहे. त्यामुळे सदरचे काम हे मतदान जागृती बाबतचे असल्याने त्यामध्ये पिंपरी चिंचवड भागातील सायकलप्रेमी संस्था व सायकल स्वार यांनी जास्तीत जास्त प्रमाणात सायकल रॉलीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी श्री. संदीप खोत यांनी केले आहे.
१००% मतदारांनी मतदान करण्याकरिता, सायकल रॅलीचे आयोजन
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 20, 2019
Rating:
No comments: