मुंबई : ज्या काळात मनोरंजनांचे साधन फक्त आकाशवाणी होते त्यावेळी अमिन सयानी यांनी‘बिनाका गीतमाला’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठा प्रेक्षकवर्ग आकाशवाणीशी जोडला. अमिन सायानी यांचे हे योगदान आकाशवाणीसाठी अमूल्य असल्याचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी सांगितले.
सी.बी.डी. फाऊंडेशन यांनी अमिन सयानी यांच्यावर आधारित ‘आवाज के दुनियाके दोस्त’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचा शुभारंभ वीर सावरकर सभागृह, दादर येथे राज्यपाल श्री. राव यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.
श्री. सायानी यांनी आपल्या आवाजाच्या माध्यमातून देशात आणि विदेशातही लोकप्रियता मिळविली. त्यांचे योगदान देश विसरणार नाही, असेही राज्यपाल श्री. राव यांनी सांगितले.
यावेळी भारतीय चित्रपट संग्राहलयाचे संचालक प्रशांत पाठराबे, सी.बी.डी. फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप चावरे, झी२४ तासचे विजय कुवळेकर आदी उपस्थित होते.
अमिन सयानी यांचे आकाशवाणीसाठी अमूल्य योगदान - राज्यपाल चे. विद्यासागर राव
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 19, 2019
Rating:
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 19, 2019
Rating:

No comments: