Seo Services
Seo Services

महावीर जयंती शहरात धार्मिक कार्यक्रमांनी साजरी

Related image


पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी जैन धर्मातील 24 वे तीर्थंकर असलेल्या भगवान महावीरांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जैन धर्मियांनी मोठ्या उत्साहाने एकत्र येऊन जयंती साजरी केली. अहिंसा रॅली, आरोग्य शिबिर, सामाजिक संस्थांना मदत असे विविध कार्यक्रम शहरात राबवण्यात आले.

निगडी येथील भगवान महावीर अहिंसा ट्रस्टच्यावतीने श्री 1008 भगवान महावीर दिगंबर जीन मंदिरात सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले होते. सकाळी साडेसात वाजता जीनमंदिरात मंगल कलश घेऊन मिरवणूक निघाली. प. पू. 108 चिंतनमहर्षी डॉ. प्रणामसागरजी महाराज यांच्या उपस्थितीत पालखी सोहळा निघाला. या पालखी सोहळ्यात जैन बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी नऊ ते एकपर्यंत नेत्रदान शिबिर झाले तसेच महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता अहिंसा रॅली निघाली. या रॅलीत विविध खेळ सादर करण्यात येऊन घोषणा देण्यात आल्या. या रॅलीची सुरुवात जैन स्थानक येथून निघून वाकड रोड, थेरगाव-प्राधिकरण - पिंपरी चौक - मार्गे रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे रॅलीचा समारोप झाला. या रॅलीचे आयोजन पिंपरी-चिंचवड जैन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक पगारिया, अध्यक्ष सूर्यकांत मुथियान, प्रकाश पगारिया, वीरेंद्र जैन, सुरेश गादिया, किरण चोपडा, मोतीलाल चोरडिया, नैनसुख मांडोत, श्रेणिक मंडलेचा आदींनी केले. यावेळी अहिंसा पुरस्काराचे वितरण प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात करण्यात आले. सीए भूषण तोष्णीवाल, मंदार देव महाराज, अशोक देशमाने आदींना अहिंसा पुरस्कार देऊन आले.
महावीर जयंती शहरात धार्मिक कार्यक्रमांनी साजरी महावीर जयंती शहरात धार्मिक कार्यक्रमांनी साजरी Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on April 18, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.