Seo Services
Seo Services

ई-फायलिंग आयकर परतावा नोंदणीत 19 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली : वर्ष 2018-19 दरम्यान आयकर परतावा ई-फायलिंगमध्ये घट झाल्याचे माध्यमांमध्ये प्रकाशित झालेले वृत्त चुकीचे असून वर्ष 2017-18 आणि 2018-19 यामध्ये प्रत्यक्षपणे कोणत्याही प्रकारची तुलना करता येण्यासारखी नाही असे आयकर विभागाने कळवले आहे.
आयकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एकूण 6.74 कोटी आयकर परताव्यांपैकी 5.47 कोटी आयकर परतावे हे चालू वर्ष 2017-18 दरम्यान ई-फायलिंगद्वारे भरण्यात आले होते. 2018-19 दरम्यान भरण्यात आलेल्या 6.68 कोटी आयकर परताव्यांमध्ये वर्ष 2018-19 च्या 6.49 कोटी आयकर परताव्यांचा समावेश आहे. याची तुलना केल्यास 19 टक्के आयकर परताव्यांमध्ये वाढ झाल्याचे निदर्शनास येते. याचाच अर्थ असा की, 2017-18 च्या तुलनेत वर्ष 2018-19 मध्ये मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे आयकर परतावे भरण्यात आले आहेत.
निकालाअंती वर्ष 2017-18 मध्ये 0.14 कोटी आयकर परतावे भरण्यात आले तर हेच आयकर परतावे आयकर कायद्यात केलेल्या सुधारणांद्वारे पुढील वर्षी ऑनलाईन भरण्यात आले होते.  ही माहिती आयकर विभागाच्या ई-फायलिंग संकेतस्थळावर सुद्धा ‘फायलिंग ग्रोथ’ या अंतर्गत उपलब्ध आहे.
ई-फायलिंग आयकर परतावा नोंदणीत 19 टक्क्यांनी वाढ ई-फायलिंग आयकर परतावा नोंदणीत 19 टक्क्यांनी वाढ Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on May 07, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.