नवी दिल्ली : 15 वा वित्त आयोग, रिझर्व बँक बँका आणि वित्तीय संस्थासमवेत येत्या 8 आणि 9 मे रोजी मुंबईत बैठका घेणार आहेत. आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग यांच्यासह आयोगाचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी या बैठकांना उपस्थित राहतील.
बृहत वित्तीय स्थिरतेबाबतची परिमाण लक्षात घेऊन 15 व्या वित्त आयोगासाठी बृहत आर्थकि परिमाणांचा आढावा, बँकाच्या पुर्नभांडवलीकरणाची आवश्यकता,
रिझर्व बँकेकडचे अतिरिक्त भांडवल भारत सरकारकडे हस्तांतरित करण्यासंदर्भातल्या विमल जालान अहवालाबाबत संभाव्य चित्र यासह इतर मुद्यांवर या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. बँका आणि वित्तीय संस्थांसमवेत होणाऱ्या बैठकीत 15 व्या वित्त आयोगाच्या काळात केंद्र आणि राज्यांकडून घेतल्या जाणाऱ्या कर्जाच्या व्याजावर चर्चा केली जाईल.
स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक, कोटक महिंद्र बँक, आयसीसीआय, एचडीएफसी यांच्यासह इतर बँका या बैठकीला उपस्थित राहतील.
रुपा रेगे नितसुरे, सौगात भट्टाचार्य, अजित रानडे, डॉ. महेंद्र देव, डॉ. अवधूत नाडकर्णी यांच्यासह नामवंत अर्थतज्ञांसमवेत वित्त आयोग बैठक घेऊन तपशीलवार चर्चा करणार आहे.
रिझर्व बँक आणि वित्तीय संस्थासमवेत 15 वा वित्त आयोग बैठक घेणार
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 07, 2019
Rating:

No comments: