Seo Services
Seo Services

राजधानीत महात्मा बसवेश्वर जयंती साजरी


नवी दिल्ली : महात्मा बसवेश्वर यांची जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली. 
कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त समीर सहाय यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त सूमन चंद्रा, विजय कायरकर, अजितसिंह नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तथा महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात महात्मा बसवेश्वर यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. जनसंपर्क अधिकारी अमरज्योतकौर अरोरा यांच्यासह कार्यालयात उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
राजधानीत महात्मा बसवेश्वर जयंती साजरी राजधानीत महात्मा बसवेश्वर जयंती साजरी Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on May 10, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.