Seo Services
Seo Services

वाहनासाठीचे पसंती क्रमांक (चॉइस नंबर) आता ऑनलाइन पद्धतीने मिळणार



पुणे : वाहनासाठीचे पसंती क्रमांक (चॉइस नंबर) आता ऑनलाइन पद्धतीने मिळणार आहे. विशेष म्हणजे या क्रमांकासाठी होणारे लिलावही ऑनलाइनच होणार आहेत. त्यासाठी परिवहन कार्यालयाने पसंती क्रमांकाच्या नियमावलीत बदल केले आहेत. तसेच 'नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर'च्या (एनआयसी) माध्यमातून यासाठीची संगणकीय प्रणाली निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांतच पसंती क्रमांकांची 'ऑफलाइन' पद्धत बंद होऊन वाहन खरेदीदारांना ऑनलाइन पद्धतीने पसंती क्रमांक खरेदी करता येणार आहे.

परिवहन विभागाने एनआयसी, दिल्लीच्या माध्यमातून 'सारथी' व 'वाहन' या संगणक प्रणालीमार्फत २०१७ पासून वाहनविषयक सर्व सेवा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध केल्या आहेत. आरटीओशी संलग्न सर्व कामे नागरिकांना घरबसल्या करता यावीत, नागरिकांना आरटीओमध्ये हेलपाटे मारण्याची आवश्यकता भासू नये, आरटीओतील गर्दी व कर्माचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करणे यासाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. सर्व प्रकारचा वाहनचालक परवाना, वाहन नोंदणी, योग्यता प्रमाणपत्र, वाहनावरील कर्ज बोजा चढविणे-उतरिवणे, दुय्यम नोंदणी प्रमाणपत्र, सर्व कर भरणे आदी सेवा ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सेवांबरोबरच पसंती क्रमांकही नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने घेता यावेत, यासाठी 'एनआयसी'ने यंत्रणा तयार केली आहे. पसंती क्रमांक ऑनलाइन पद्धतीने देण्यासाठी नियमावलीत बदल करणे आवश्यक होते. त्यामुळे यंत्रणा तयार असूनही ही सेवा ऑनलाइन होत नव्हती.

अशी आहे यंत्रणा...

परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर दुचाकी आणि चारचाकी वाहनाच्या मालिकेतील सर्व क्रमांक दिसणार. वाहनमालकाने ऑनलाइन पद्धतीने क्रमांक पसंत करून शुल्क भरावे. जर एका क्रमांकासाठी अनेकांनी शुल्क भरले असेल, तर त्या क्रमांकाचा ऑनलाइन लिलाव. जो वाहनमालक जास्त बोली लावेल, त्याला संबंधित क्रमांक मिळणार. ही सेवा पूर्णपणे मानवी हस्तक्षेपरहित असणार आहे.

शेखर चन्ने, परिवहन आयुक्त
वाहनासाठीचे पसंती क्रमांक (चॉइस नंबर) आता ऑनलाइन पद्धतीने मिळणार वाहनासाठीचे पसंती क्रमांक (चॉइस नंबर) आता ऑनलाइन पद्धतीने मिळणार Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on May 06, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.