नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राफेल विमान खरेदी व्यवहाराबाबत दिलेल्या निकालाच्या फेरविचारासाठी दाखल झालेल्या याचिकेची आता शुक्रवारी १० मे रोजी सुनावणी होणार आहे.
राफेलसंबंधी गोपनीय कागदपत्रे उघड झाल्याने न्यायालयाने आधीच्या निकालाचा फेरविचार करावा, यासाठी ही याचिका दाखल झाली होती. न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत ‘चौकीदार चोर है’चा निर्वाळा न्यायालयानेही दिल्याचे वक्तव्य राहुल यांनी केले होते. त्याप्रकरणी दाखल झालेल्या अवमान याचिकेची सुनावणीही राफेल फेरविचार याचिकांसोबत घेतली जाईल, असे न्यायालयाने आधी जाहीर केले होते. त्यानुसार सोमवारी या दोन्ही याचिकांची सुनावणी अपेक्षित होती. मात्र कामकाज सुरू झाले तेव्हा सुनावणी वेगवेगळ्या दिवशी ठेवल्याचे उघड झाले.
या प्रकरणी सरन्यायाधीश रंजन गोगोई म्हणाले की, ‘‘या दोन्ही याचिकांची एकत्रित सुनावणी होईल, असे आम्ही आधीच जाहीर केले होते. तरीही फेरविचार याचिकांची सुनावणी सोमवारी आणि अवमान याचिकेची सुनावणी १० मे रोजी ठेवली गेली आहे. या प्रकाराने आम्ही थोडे गोंधळलो आहोत. त्यामुळे आता या दोन्ही याचिकांचा एकत्रित विचार १० मे रोजीच दुपारी दोन वाजता केला जाईल.
राफेल विमान खरेदी व्यवहाराबाबत सुनावणी शुक्रवारी
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 08, 2019
Rating:
No comments: