नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यात सात राज्यांतील ५१ जागांसाठी सोमवारी सुमारे ६२ टक्के मतदान झाले. जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्य़ातील एका मतदान केंद्रावर झालेले दोन स्फोट आणि पश्चिम बंगालमध्ये बराकपूर येथे निर्माण झालेला तणाव वगळता, मतदान शांततेत झाले. बऱ्याच ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये बिघाडाच्या तक्रारीही आल्या.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, पक्षाध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड, राजीव प्रताप रुडी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या दिग्गजांचे भवितव्य या मतदानात पेटीबंद झाले. उत्तर प्रदेशातील १४, राजस्थानमधील १२, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशातील प्रत्येकी ७, बिहारमधील ५ आणि झारखंडमधील ४ मतदारसंघांमध्ये पाचव्या टप्प्यात मतदान झाले.
सर्वाधिक म्हणजे ७४.४२ टक्के मतदान पश्चिम बंगालमध्ये झाले. लडाखमध्ये ६४ टक्के मतदान झाले, तर अनंतनागच्या दहशतवादग्रस्त पुलवामा आणि शोपियाँ येथे अवघे तीन टक्के मतदान झाले. जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यादेखील अनंतनागमधून लोकसभेसाठी रिंगणात आहेत.
रायबरेली आणि अमेठी या दोन जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. त्या अमेठीत ५३ टक्के, तर रायबरेलीत ५३.६८ टक्के मतदान झाले.
लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यात ६२ टक्के मतदान
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 08, 2019
Rating:

No comments: