पुणे : पुणे जिल्हयामध्ये दुष्काळ निवारण्यासाठी करण्यात येणा-या उपाययोजनांकरीता जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. याकरीता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दुष्काळ तक्रार निवारण व आपत्ती व्यवस्थापनाकरीता कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षामार्फत नागरिकांकडून दुष्काळाविषयी येणा-या तक्रारींकरीता स्वतंत्रपणे नोंद घेण्यात येऊन चारा छावणी, पाणी टंचाई व त्याबाबतच्या उपाययोजना करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येत आहे. जिल्ह्यामध्ये टँकरची मागणी आल्यास 24 तासात मंजूरी देण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे आतापर्यंत 6 चारा छावण्यांना मंजूरी देण्यात आली आहे. चारा छावण्यांच्या नवीन प्रस्तावांना 24 तासातच मंजूरी देण्यात येऊन त्याची कार्यवाही करण्यात येत आहे. चाऱ्याच्या उपलब्धेकरीता माहे मे 2019 पर्यंत नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार कृषि विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषि विभागाकडील चारा पिकाखाली , पशुसंवर्धन विभागाकडील कामधेनु दत्तक ग्राम योजना, वैरण विकास योजना , जि.प.सेस अंतर्गत, उसाच्या वाढयापासून,आत्मा आणि टीएससी/केव्हीके, जलाशयाखालील / तलावाखालील गाळपेरापासून, कृषि विभागाकडून उन्हाळी हंगाम अशा एकूण 202654.09 हेक्टर क्षेत्रापासून एकूण 1486790.9 मे.टन तर उसा पासून उपलब्ध होणारा चारा (व्होल) 1297341 मे.टन अशा एकूण 2784131.9 मे. टन चा-याचे नियोजन माहे मे 2019 अखेर करण्यात आलेले आहे.याकरीता पुरेसा निधी उपलब्ध झालेला आहे
दुष्काळ निवारण,टँकर मागणी, चारा छावणी तसेच आपत्ती व्यवस्थापन इ. विषयांकरीता नागरिकांनी त्यांच्या तक्रार किंवा सूचनांकरीता 1077 या टोल फ्री व 020- 26123371 या संपर्क क्रमांकांचा वापर करावा, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आवाहन केले आहे.
दुष्काळ निवारण उपाययोजनांकरीता पुणे जिल्हा प्रशासन सज्ज
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 12, 2019
Rating:
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 12, 2019
Rating:

No comments: