पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची मे महिन्याची सर्वसाधारण सभा सोमवारी झाली. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. या सभेत विषय समितीच्या नवीन सदस्यांची निवड करण्यात आली. सदस्य निवडीनंतर महासभा 6 जून 2019 दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
विधी समिती: - अश्विनी बोबडे, कमल घोलप, उषा ढोरे, मनीषा पवार, अनुराधा गोरखे (भाजप), उषा वाघेरे, उषा काळे, सुलक्षणा धर (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रमोद कुटे (शिवसेना).
महिला व बालकल्याण समिती:- भीमाबाई फुगे, निर्मला कुटे, साधना मळेकर, उषा मुंडे, सुजाता पालांडे (भाजप), सुमन पवळे, निकिता कदम, अनुराधा गोफणे (राष्ट्रवादी काँग्रेस), अश्विनी चिंचवडे (शिवसेना).
शहर सुधारणा समिती:- राजेंद्र लांडगे, लक्ष्मण सस्ते, कैलास बारणे, सुनीता तापकीर, आशा शेंडगे (भाजप), वैशाली घोडेकर, संतोष कोकणे, संजय वाबळे (राष्ट्रवादी काँग्रेस), रेखा दर्शले (शिवसेना).
क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती:- तुषार हिंगे, अभिषेक बारणे, बाबा त्रिभुवन, विकास डोळस, सागर गवळी (भाजप), राजू मिसाळ, अपर्णा डोके, विनोद नढे (राष्ट्रवादी काँग्रेस), निलेश बारणे (शिवसेना).
सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी बंद पाकिटातून समिती नियुक्त करण्यात येणा-या पक्षाच्या सदस्यांची नावे महापौर राहुल जाधव यांच्याकडे दिली. त्यानंतर महापौर जाधव यांनी सदस्यांची नावे वाचून समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याचे जाहीर केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका विविध समिती सदस्य निवड
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 20, 2019
Rating:
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 20, 2019
Rating:

No comments: