Seo Services
Seo Services

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 15 शाळांमध्ये आठवीचे वर्ग सुरू होणार


पिंपरी : महाराष्ट्र राज्य शासन निर्णयानुसार 2014-15 या शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक विद्यार्थ्याला जवळच्या शाळेत आठवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून याबाबत 6 वर्षांपासून कोणाताही अंमलबजावणी झाली नाही. त्यानंतर यंदा 15 शाळांनी आठवीचे वर्ग सुरू करण्याबाबत तयारी दर्शविली आहे.

सन 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, तसा प्रस्ताव मंजुरीसाठी शिक्षण समितीकडे ठेवण्यात आला आहे. त्यानुसार उपलब्ध वर्ग खोल्या आणि शिक्षकांवरही हा भार टाकण्यात आला आहे.

यामध्ये विद्यार्थ्यांना 1 किलोमीटरपर्यंत शाळा नसलेल्या पूर्व प्राथमिकला पाचवीची तुकडी, तर 3 किलोमीटरपर्यंत शाळा नसलेल्या पाचवी ते सातवीच्या वर्गांना आठवीची तुकडी जोडण्याचे निकष आहेत. त्यानुसार पालिकेच्या शाळांचा अहवाल तयार करण्यात आला आहे. तसेच पूर्व प्राथमिकमधील 30 विद्यार्थ्यांसाठी एक, तर उच्च प्राथमिकसाठी 35 विद्यार्थ्यांसाठी एक याप्रमाणे वाढीव तुकड्यांना शिक्षक उपलब्ध करून दिले जाणार आहेत. शिक्षण समितीच्या निर्णयानंतर वर्ग सुरू करण्यात येतील, अशी माहिती प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 15 शाळांमध्ये आठवीचे वर्ग सुरू होणार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 15 शाळांमध्ये आठवीचे वर्ग सुरू होणार Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on May 20, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.