Seo Services
Seo Services

दुष्काळी परिस्थितीत सरकारला कामे करता यावीत; निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता शिथील


मुंबई : महाराष्ट्रात दुष्काळामुळे तीव्र चारा आणि पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीत राज्य सरकारला कामे करता यावीत, यासाठी निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता शिथील करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे दुष्काळातील कामांसाठी आचारसंहिता शिथील करण्याती विनंती केली होती. ही विनंती निवडणूक आयोगाने मान्य केली आहे.
दुष्काळी प्रदेशात काम करण्याची परवानगी दिली असली तरी केलेल्या कामाची प्रसिद्ध न करण्याच्या स्पष्ट सूचना निवडणूक आयोगाने राज्य सरकारांना दिले आहेत.
दरम्यान, राज्य सरकारने याआधिच 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. मात्र राज्यातील अनेक भागात तीव्र चारा आणि पाणीटंचाई निर्माण झाली असून तात्काळ पावलं उचलणे गरजेचं झालं आहे.
दुष्काळी परिस्थितीत सरकारला कामे करता यावीत; निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता शिथील दुष्काळी परिस्थितीत सरकारला कामे करता यावीत; निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता शिथील Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on May 05, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.