Seo Services
Seo Services

मध्यम पल्ल्याच्या भूपृष्ठावरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली भारतीय नौदलाने मध्यम पल्ल्याच्या भूपृष्ठावरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राच्या चाचणीने महत्वपूर्ण यश प्राप्त केले आहे. पश्चिमी समुद्रकिनाऱ्यावर नौदलाच्या कोची आणि चेन्नई या नौकांद्वारे ही चाचणी करण्यात आली. भारतीय नौदल, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि इस्रायल एअरो स्पेस इंडस्ट्रीज द्वारा ही चाचणी घेण्यात आली.
ही चाचणी म्हणजे अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित आहे. डीआरडीएल हैद्राबाद, डीआरडीओ प्रयोगशाळा यांनी इस्रायल एअरो स्पेस इंडस्ट्रीजच्या सहयोगाने संयुक्तपणे हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.
जमिनीवरुन हवेत मारा करणारं हे क्षेपणास्त्र कोलकाता श्रेणीतल्या विनाशिकेवर तसेच भारतीय नौदलाच्या भविष्यातल्या सर्व युद्ध नौकांवरही वापरले जाऊ शकते. या सफलतेमुळे ही विशिष्ट क्षमता बाळगणाऱ्या गटात भारतीय नौदलाचा समावेश झाला आहे.  
मध्यम पल्ल्याच्या भूपृष्ठावरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी मध्यम पल्ल्याच्या भूपृष्ठावरुन हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on May 17, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.