Seo Services
Seo Services

तिर्थक्षेत्र विकास आराखडा सर्व यंत्रणांनी ताळमेळ ठेवून कामे मुदतीत पूर्ण करावीत -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर


पुणे : विभागातील तिर्थक्षेत्र विकास आराखडयातील विविध मंजूर कामांचा सर्व यंत्रणांनी आढावा घेऊन, आपापसात ताळमेळ ठेवून मंजूर विकास कामे मुदतीत पूर्ण करावीत असे निर्देश, विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज येथे झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.

पुणे, सातारा व सोलापूर जिल्हयातील श्री क्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, नेवासा पालखीतळ/मार्ग, श्री क्षेत्र भिमाशंकर विकास आराखडा आणि श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर तिर्थक्षेत्र विकास आराखडयातील कामांचा आढावा घेण्यासाठी विधान भवन सभागृहात विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, भूसंपादन उपायुक्त जयंत पिंपळगांवकर, विशेष कार्य अधिकारी उत्तम चव्हाण बैठकीला उपस्थित होते.

तिर्थक्षेत्र परिसराचा विकास करुन त्याठिकाणी भाविकांना आवश्यक सोई सुविधा पुरविण्यासाठी विविध विकास कामांना यापूर्वी मंजूरी देण्यात आली आहे. मंजूरी देण्यात आलेल्या कामांच्या प्रगतीचा अहवाल संबधित जिल्हाधिकारी यांनी बैठकीत सादर केला. उर्वरित कामे पूर्ण होण्यासाठी अधिकाऱ्यांनी  कालबध्द नियोजन करुन, आवश्यक असल्यास अनुदानाची मागणी वेळेवर करुन, सुरु असलेली कामे मागे पडणार नाही, याची काटेाकोरपणे दक्षता घेण्याची सूचना विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी यावेळी केली.

संबधित जिल्हयांचे उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, जिल्हा नियोजन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, नगर परिषदेची मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी यांनी तिर्थक्षेत्र विकास आराखडयातील कामांची माहिती बैठकीत सादर केली. श्री क्षेत्र निरा नृसिंहपूर येथील माणकेश्वर वाडा व मुख्य मंदिराभोवतीचा परिसर विकसीत करणे, श्री क्षेत्र भिमाशंकर येथील सामुहिक सेवा केंद्र, प्रवेशद्वार, पायरीमार्ग, सार्वजनिक शैाचालय, महादेव वन, दगडी मंडप बांधकाम, मिडी बसेस तसेच श्री क्षेत्र देहू व आळंदी पालखी मार्गावरील व पंढरपूर येथील चालू असलेल्या विकास कामांचा बैठकीत आढावा घेण्यात आला.
तिर्थक्षेत्र विकास आराखडा सर्व यंत्रणांनी ताळमेळ ठेवून कामे मुदतीत पूर्ण करावीत -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर तिर्थक्षेत्र विकास आराखडा  सर्व यंत्रणांनी ताळमेळ ठेवून कामे मुदतीत पूर्ण करावीत  -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on May 15, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.