अति उष्णतेमुळे राष्ट्रपती भवनात होणारा ‘चेंज ऑफ गार्ड’ समारंभ या रविवारपासून होणार नाही, मात्र शनिवारी नेहमीप्रमाणे सुरू राहील
नवी दिल्ली : अति उष्ण हवामानामुळे नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात दर शनिवारी आणि रविवारी होणारा ‘चेंज ऑफ गार्ड’ समारंभ फक्त शनिवारी नेहमीसारखा सुरू राहील.
येत्या रविवारपासून (5 मे 2019) हा समारंभ तात्पुरता स्थगित करण्यात आला असून पुढील आदेश मिळेपर्यंत हा समारंभ स्थगितच राहील. मात्र, प्रत्येक शनिवारी 10.00 ते 10.40 या वेळेत(15 नोव्हेंबर ते 14 मार्च) आणि 8.00 ते 8.40 या दरम्यान (15 मार्च ते 14 नोव्हेंबर) हा समारंभ सुरूच राहील.
या समारंभाला उपस्थित राहण्यासाठी https://rb.nic.in/rbvisit/rbvisit_cog.aspx. या वेबसाईटवर अर्ज करता येईल.
अति उष्णतेमुळे राष्ट्रपती भवनात होणारा ‘चेंज ऑफ गार्ड’ समारंभ या रविवारपासून होणार नाही, मात्र शनिवारी नेहमीप्रमाणे सुरू राहील
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 02, 2019
Rating:
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 02, 2019
Rating:

No comments: