Seo Services
Seo Services

किलोग्रॅम, केल्विन, मोल आणि ॲम्पिअर या मापन एककांची नवी व्याख्या


नवी दिल्ली : जागतिक माप विज्ञान दिवसाचे औचित्य साधून आजपासून जगभरात किलोग्रॅम, केल्विन, मोल आणि ॲम्पिअर या मापन एककांची नवी व्याख्या लागू होत आहे.
दशकांपासून प्रयोगशाळांमध्ये सुरु असलेल्या प्रयोगांनंतर 16 नोव्हेंबर 2018 रोजी जगभरातल्या शास्त्रज्ञांनी एकमताने, सात आंतरराष्ट्रीय एककांपैकी, किलोग्रॅम (भार मापक एकक), केल्विन (तापमान मापक एकक), मोल (पदार्थ मापक एकक) आणि ॲम्पिअर (विद्युत मापक एकक) या चार एककांची पुन्हा व्याख्या करण्याचा निर्णय एका संमेलनात घेतला होता.
नव्या व्याख्येमुळे आंतरराष्ट्रीय व्यापार, उच्च तंत्रज्ञान निर्मिती, मानवी आरोग्य आणि सुरक्षा, पर्यावरण सुरक्षा, हवामान बदल अभ्यास आणि मूलभूत विज्ञानाच्या क्षेत्रात सुलभता येईल.
या संशोधनात सहभागी झाल्याबद्दल सीएसआयआरचे महासंचालक शेखर मांडे यांनी राष्ट्रीय भौतिक प्रयोगशाळेचे अभिनंदन केले आहे.
किलोग्रॅम, केल्विन, मोल आणि ॲम्पिअर या मापन एककांची नवी व्याख्या किलोग्रॅम, केल्विन, मोल आणि ॲम्पिअर या मापन एककांची नवी व्याख्या Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on May 21, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.