Seo Services
Seo Services

मतमोजणी दिवशीचे वाहतुकीचे नियमनाची तयारी पूर्ण



पुणे : पुणे जिल्हयामधील मावळ शिरुर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकुलामध्ये दि.23 मे 2019 रोजी होणार आहे.  या दिवशी करण्यात येणा-या वाहतुकीचे नियमनाची तयारी पोलीस विभागाकडून करण्यात आली आहे. त्याविषयी राजकीय पक्षांच्या उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना  तसेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देण्याकरीता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
              
या बैठकीला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे अति.आयुक्त दिलीप गावडे, उप जिल्हाधिकारी संदीप निचित, पिंपरी-चिंचवड परिमंडल-2 च्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त  (प्रशासन) श्रीधर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक ( वाहतूक) किशोर म्हसवडे आदी अधिकारी उपस्थित होते.
              
यावेळी पोलीस प्रशासनाकडून उपस्थित राजकीय पक्षांचे उमेदवार त्यांच्या प्रतिनिधींना मतमोजणीच्या दिवसाची वाहतुकीविषयी माहिती देताना कोणत्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना कोणत्या ठिकाणी आपली वाहने पार्क करता येईल याबाबतची माहिती देवून   मतमोजणीकरीता उपस्थित राहणा-या सर्वच अधिकारी, कर्मचारी, उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी मतमोजणी प्रतिनिधींच्या वाहनांना  ओळखपत्र पाहून मुख्य दरवाज्यातून सकाळी 7 वाजेपर्यंतच प्रवेश देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. तसेच ओळखपत्राशिवाय आत सोडले जाणार नाही एकदा आत सोडल्यानंतर बाहेर जाताना त्याचे ओळखपत्र जमा करण्यात येवून पुन्हा त्यांना आत सोडले जाणार नाही.तसेच मतमोजणी केंद्रात कोणालाही मोबाईल नेण्यास बंदी असल्याची   माहिती  यावेळी देण्यात आली.


मतमोजणी दिवशीचे वाहतुकीचे नियमनाची तयारी पूर्ण मतमोजणी दिवशीचे वाहतुकीचे नियमनाची तयारी पूर्ण Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on May 20, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.