Seo Services
Seo Services

राज्यातील तापमानात वाढ होणार वाढत्या तापमानापासून लोकांनी काळजी घ्यावी



मुंबई राज्यामध्ये बऱ्याच भागातील कमाल तापमानात 19 मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भमराठवाडा आणि खान्देशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मेपर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहिल.

अकोलानागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान 46 अंशापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहेतर चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान 47 अंशापर्यंत पोहोचण्याची शक्यता नाकारता येणार नाही. विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांसह धुळे,जळगावनांदेड आणि परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान 45 अंशापर्यंत पोहोचेल.

उर्वरित मराठवाडा आणि खान्देशात कमाल तापमान 42 अंशाच्या आसपास राहील असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 18 ते 21 मे दरम्यान मुंबईतील कमाल तापमानात वाढ अपेक्षित आहे. वाढत्या तापमानापासून विदर्भ,मराठवाडा आणि खान्देशातील लोकांनी काळजी घ्यावी. लोकांनी योग्य प्रमाणात पाणी प्यावे आणि उष्माघाताचे लक्षण आढळल्यास त्यावर लागलीच उपचार करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील तापमानात वाढ होणार वाढत्या तापमानापासून लोकांनी काळजी घ्यावी राज्यातील तापमानात वाढ होणार वाढत्या तापमानापासून लोकांनी काळजी घ्यावी Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on May 17, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.