Seo Services
Seo Services

राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात 'पुरुषोत्तम' चा स्पेशल शो संपन्न.



पुणे :  औरंगाबाद महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या प्रशासकीय कामगिरीवर आधारित 'पुरुषोत्तम' हा मराठी चित्रपट शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. 

पुणे येथे राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या कोथरूड येथील मिनी थिएटरमध्ये शनिवारी दि. ११ मे रोजी दिवंगत अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या वाढदिवसानिमित्त या 'पुरुषोत्तम' या चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी दिग्दर्शिका रिमा अमरापूरकर, अभिनेत्री देविका दप्तरदार, केतकी अमरापूरकर, पूजा पवार, अभिनेते नंदू माधव, उमेश घेवरीकर, देवीप्रसाद सोहोनी, दिप्ती घोडके, भगवान राऊत, सुहास लहासे, सहाय्यक दिग्दर्शिका भाग्यश्री राऊत आदी उपस्थित होते. 

लोकहिताची कामे करणाऱ्या प्रामाणिक व कर्तव्य दक्ष प्रशासकीय अधिकाऱ्यांचे काम जनतेसमोर यावे या हेतूने संवेदना फिल्म फौंडेशन व आदर्श ग्रुप निर्मित, श्रीमती सुनंदा अमरापूरकर प्रस्तुत 'पुरुषोत्तम' हा चित्रपट  सर्व जनतेने चित्रपट गृहात जाऊन पहावा, असे आवाहन दिग्दर्शिका रिमा अमरापूरकर यांनी यावेळी केले.

पुरुषोत्तम या चित्रपटाच्या माध्यमातून तत्कालीन म.न.पा. आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची भूमिका मी या चित्रपटात साकारली आहे. आपल्याच मातीतील, आपल्याच माणसांची कामगिरी जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पहावा व पुरुषोत्तमच्या टिमला पाठबळ द्यावे असे आवाहन नंदू माधव यांनी यावेळी केले.

जेष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी पुरुषोत्तम या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले. यावेळी सुनिल सुकथनकर, सुनिल महाजन, प्रा. मंगेश जोशी, शांभवी जोशी, दिग्दर्शक मिलिंद लेले, डॉ. अनिल अवचट यांच्यासह पुण्यातील साहित्य, कला, क्रीडा, नाट्य, व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात 'पुरुषोत्तम' चा स्पेशल शो संपन्न. राष्ट्रीय फिल्म संग्रहालयात 'पुरुषोत्तम' चा  स्पेशल शो संपन्न. Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on May 12, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.