Seo Services
Seo Services

जर्मनीतील तिकीट प्रदर्शनात किशोर चंडक यांचा सन्मान

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सोलापूरचे उद्योजक किशोर चंडक यांना जर्मनी येथे भरलेल्या जागतिक तिकीट प्रदर्शनात लार्ज गोल्ड या अतिउच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात जवळपास २ हजार ८०० जणांनी सहभाग घेतला होता. भारतामध्ये पोस्टाचा पत्रव्यवहार सुरु झाल्यानंतर पत्र ज्या गावात पोहोचलं त्या गावात शिक्का मारला जात असे तेव्हापासूनच्या शिक्यांचा अभ्यास करून त्याचा उत्कृष्ट संग्रह चंडक यांनी जर्मनीमध्ये मांडला होता. चंडक यांनी तिकीटाचा संग्रह करायला १९६३ साली सुरुवात केली आणि १९८३ पासून त्यांनी प्रदर्शनात भाग घ्यायला सुरुवात केली. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये भाग घेतला असून अनेक ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

जर्मनीतील तिकीट प्रदर्शनात किशोर चंडक यांचा सन्मान जर्मनीतील तिकीट प्रदर्शनात किशोर चंडक यांचा सन्मान Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on May 30, 2023 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.