मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या जिल्हा वार्षिक योजनांसह विविध योजनांमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे. त्यांना स्वावलंबी आणि स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल असं प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी नंदुरबार इथं केलं आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी झेरॉक्स यंत्र वाटपासाठी अनुदान निवडपत्र त्यांच्या हस्ते काल देण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते.
राज्य शासनाच्या विविध योजनांमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी राखीव
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
June 30, 2023
Rating:
No comments: