Seo Services
Seo Services

बारामतीला 30 जानेवारी रोजी रेशीम कोष खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ

Image result for बारामतीला 30 जानेवारी रोजी रेशीम कोष खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ



बारामती नागपुर येथील रेशीम संचालनालयाच्यावतीने रेशीम कोष खुली बाजारपेठ सुरु करण्यास  मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार रेशीम कोष खरेदी, विक्री केंद्राचा उद्घाटन समारंभ जुने भाजी मार्केट शेजारी सेल हॉल, येथे आणि रेशीम उत्पादक शेतकरी मेळावा  रयतभवन कार्यालय, मार्केट कमिटी, इंदापूर रोड, बारामती येथे  बुधवार दिनांक 30 जानेवारी 2019 रोजी सकाळी 9.30 वा. राज्याचे  माजी उपमुख्यमंत्री  तथा आमदार अजितदादा पवार यांच्या हस्ते व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
यावेळी पुणे जिल्हा परिषदचे अध्यक्ष विश्वासनाना देवकाते, बारामती कृषि विकास प्रतिष्ठानचे, चेअरमन राजेंद्र पवार, नागपूर रेशीम संचालनालयाचे संचालक भाग्यश्री बानायत (भा.प्र.से), सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभागाचे सचिव डॉ.के.एच.गोविंदराज (भा.प्र.से),  बेंगलोर रेशीम कोष मार्केटचे उपसंचालक, जे.एम.मुंशी बसाय्या तसेच  राज्याचे पणन संचालक दिपक तावरे ( भा.प्र.से), प्रादेशिक रेशीम कार्यालय,पुणेच्या सहसंचालक, डॉ.कविता देशपांडे इ.मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. तरी या मेळाव्यास उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी प्रियांका गणाचार्य यांनी केले आहे.

बारामतीला 30 जानेवारी रोजी रेशीम कोष खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ बारामतीला 30 जानेवारी रोजी रेशीम कोष खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on January 29, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.