Seo Services
Seo Services

गणराज्य दिवस संपताच भारतीय सेना सेवा निवृत्त ज्येष्ठ नागरिकांस शिवीगाळ



स्वस्तिक आवटे (उप संपादक)

चिखली: पिंपरी चिंचवड महानगरपालिका मधील सेक्टर नंबर 17 / 19 घरकुल येथे घरकुलच्या नावावरून चाललेला वाद आणि स्थानिक नागरिकांचा राज्यकर्त्यांवरचा  रोष असताना सत्तारूढ पक्षनेते श्री. एकनाथ पवार व त्यांचा खाजगी स्वीय सहाय्यक श्री राहुल हे त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त घरकुल मध्ये आले होते. या प्रसंगी  घरकुल मधील भारतीय सेना सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक श्री रघुनाथ सावंत  व घरकुल मधील मान्यवर  घरकुल नामकरण वरून श्री एकनाथ पवार यांच्याबरोबर चर्चा करत असताना, श्री एकनाथ पवार व त्यांचा  स्वीय सहाय्यक श्री राहुल  यांची घरकुल धारकांबरोबर  सकाळी ११ वाजता शाब्दिक बाचाबाची झाली. याप्रसंगी भारतीय सेना सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक श्री रघुनाथ सावंत यांच्या अंगावर जाऊन गलिच्छ शिवीगाळ केल्याप्रकरणी श्री.एकनाथ पवार यांचे स्वीय सहाय्यक श्री राहुल यांच्यावर गुन्हा  दाखल करून समज देऊन न सोडता कठोर कारवाई करावी अशी मागणी आणि तक्रार फेडरेशन  ऑफ  घरकुलकडून चिखली पोलीस ठाणे पूर्णनगर येथे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.
प्रशासन घरकुलला स्व.गोपीनाथ मुंडे यांचे नाव देणार असून रहिवाशांचा याला विरोध आहे. या करिता  २०/०१/२०१९ तारखेला शेकडोंच्या संख्येने एक दिवसीय लाक्षणिक उपोषणदेखील घरकुलधारकांनी केलं होत. याचा राग मनात ठेऊन सत्तारूढ पक्षनेते श्री. एकनाथ पवार यांनी स्वीय सहाय्यक श्री. राहुल यांना फुस लावली आहे. श्री राहुल यांनी एका ज्येष्ठ माजी सैनिकाला शिवीगाळ केली आहे. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. यावरून  घरकुलकरांनी  निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.


गणराज्य दिवस संपताच भारतीय सेना सेवा निवृत्त ज्येष्ठ नागरिकांस शिवीगाळ गणराज्य दिवस संपताच भारतीय सेना सेवा निवृत्त ज्येष्ठ नागरिकांस शिवीगाळ Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on January 27, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.