Seo Services
Seo Services

महानगरपालिकेने जागेचा मोबदला व्याजासह द्यावा, कामगार कल्याण मंडळाची मागणी.....


पिंपरी : अण्णासाहेब मगर स्टेडियमला दिलेल्या जागेच्या मोबदल्यात महापालिकेने कामगार कल्याण मंडळाला भूखंड हस्तांतरित केला नाही, परिणामी या जागेच्या मोबदल्यात करारामध्ये नमूद केलेले उर्वरित चार कोटी रुपये मागील 27 वर्षाच्या व्याजासह मिळावेत, अशी मागणी कामगार कल्याण मंडळाच्या सदस्य भारतीच्या वाणी यांनी आयुक्तांकडे केली आहे. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यात 1992 मध्ये झालेल्या करारानुसार अण्णासाहेब मगर स्टेडियम कामगार कल्याण मंडळाच्या वतीने महापालिकेला हस्तांतरित केली. त्याबदल्यात महापालिका पाच कोटी रुपये आणि पाच भूखंड देण्याचा ठराव करण्यात आला होता. त्यापैकी मंडळास आतापर्यंत एक कोटी मिळाले आहेत. 2003 मध्ये पाठपुरावा केल्यानंतर सर्वे नंबर 5 मोशी येथे दोन एकर, सेक्टर नंबर 25 प्लॉट क्रमांक 290 येथे 25 हजार चौरस फूट, सेक्टर 26 जलतरण तलावाजवळ दोन एकर त गाव सर्वे नंबर 9 मध्ये दीड एकर, चिंचवड सर्वे नंबर 195 येथे वीस हजार चौरस फूट असे भूखंड देण्याचे ठरले होते. यापैकी चिंचवड सर्वे नंबर 195 मधील जागा ताब्यात मिळाली आहे. भारती चव्हाण म्हणाल्या महापालिकेने 1992 ते 2019 या कालावधीत कामगार कल्याण मंडळात भूखंड हस्तांतरित केले नाही. त्यामुळे लाखो कामगारांवर अन्याय झाला आहे. या प्रकरणाचा वेळोवेळी पाठपुरावा केला. वारंवार सुधारित करार करून ही सर्व कराराचा भंग महापालिकेने केला आहे, भूखंड हस्तांतरीत न केल्याने कामगार कल्याण मंडळमार्फत उभारण्यात येणारे कोणतेही प्रकल्प पिंपरी-चिंचवडमध्ये उभारले गेले नाहीत. पर्यायाने कामगार आणि कामगार कुटुंबीय या सोयी-सुविधांपासून वंचित राहिले. अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मोबदल्यात करारात नमूद केलेली उर्वरित चार कोटी रुपये मागील 27 वर्षाच्या व्याजासह मिळावेत, अशी मागणी भारती यांनी केली आहे.

महानगरपालिकेने जागेचा मोबदला व्याजासह द्यावा, कामगार कल्याण मंडळाची मागणी..... महानगरपालिकेने जागेचा मोबदला व्याजासह द्यावा, कामगार कल्याण मंडळाची मागणी..... Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on January 30, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.