Seo Services
Seo Services

प्रजासत्ताक दिनाचा 69 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

राज्याच्या विकासामध्ये सर्वांनी योगदान द्यावे…   पालकमंत्री गिरीश बापट


        26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी,2019 दरम्यान लोकशाही पंधरवडा साजरा होणार

                                                                                                                                                              
पुणे दि. 26 :- आपण साजरा करीत असलेला प्रजासत्ताक दिन हा लोकशाहीचा उत्सव असून विविध प्रयत्नांमुळे लोकशाही अधिकाधिक मजबूत होत आहे. नागरिक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र राज्य शासनाच्यावतीने लोकोपयोगी योजना राबविण्यात येतात. शासनाबरोबर नागरिकांनीही राज्याच्या विकासामध्ये योगदान द्यावे, असे आवाहन अन्न नागरी पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज येथे केले.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदनावर ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. समारंभास स्वातंत्र्य सैनिक, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, आमदार मेधा कुलकर्णी, आमदार निलम गोऱ्हे, आमदार माधुरी मिसाळ,महापौर मुक्ता टिळक, यशदाचे महासंचालक आनंद लिमये,विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे, पोलीस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील उपस्थित होते.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री.बापट म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनांच्या अंमलबजावणीमुळे शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. स्वस्त धान्य दूकानांतून धान्य वितरणासाठी -पॉस मशिनचा वापर झाल्यामुळे गरीबांना योग्य प्रमाणात आणि वेळेवर धान्य मिळत असून त्यामुळे केरोसीनची बचत झाली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेद्वारे महिलांना गॅस जोडणी मिळाल्यामुळे महिलांचे जीवन सुखकर झाले असून मोठया संख्येने नागरिकांनी गॅसवरील सबसीडी सोडून दिली आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजनेद्वारे लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. शहराच्या सभेावताली असलेल्या भागाचा पीएमआरडीएतर्फे करण्यात येत असलेल्या विकास कामांमुळे आणि हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पामुळे  सभोवतालच्या परिसराचा विकास होणार असून हा भाग इकोनॉमीकल कॉरिडॉर म्हणून ओळखला जाईल, असे सांगितले. मतदारांनी सर्व निवडणूकांमध्ये राष्ट्रीय कर्तव्य भावनेतून मतदान प्रक्रियेत भाग घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पोलीस दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांना जाहीर करण्यात आलेली पदके आणि अन्य पारितोषिके पालकमंत्र्यांच्याहस्ते वितरीत करण्यात आली. पोलीस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल, एनसीसी अग्नीशमन दलाने संचलन करुन पालकमंत्र्यांना मानवंदना दिली. यावेळी विविध शाळांतील मुला-मुलींनी आपल्या गुणदर्शनाचे प्रदर्शन करुन सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक प्रमुख नागरिकांची पालकमंत्र्यांनी भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी,पत्रकार, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनाचा 69 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा प्रजासत्ताक दिनाचा 69 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on January 26, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.