Seo Services
Seo Services

महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांचा देशभक्तीवर गाण्यांचा कार्यक्रम



स्वस्तिक आवटे (उप संपादक)

चिखली : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभाग प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने २६ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० वाजता मदनलाल धिंग्रा मैदान निगडी प्राधिकरण येथे महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांचा देशभक्तीवर गाण्यांचा कार्यक्रम होणार असून, सदर कार्यक्रमात एकूण महानगरपालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक अशा १०५ शाळेतील ५२५० तसेच आर.एस.पी. पथकाचे चार माध्यमिक विद्यालयाचे २०० विद्यार्थी, असे एकूण ५४५० विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यामध्ये ८७ प्राथमिक शाळा व १८ माध्यमिक शाळा आहेत आणि या शाळांमधील ५४५० विद्यार्थ्यांची संबंधित शाळा ते मदनलाल धिंग्रा मैदान निगडी प्राधिकरण ने-आण करण्यासाठी  पी. एम. पी. एम. एल. बसेसची व्यवस्था महानगरपालिकेमार्फत केली आहे. तसेच या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री श्री गिरीश बापट यांच्या शुभहस्ते  व महापौर श्री. राहुल जाधव अध्यक्षतेखाली व खासदार श्री अमर साबळे, खासदार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्री. श्रीरंग बारणे, खासदार श्रीमती सुप्रिया सुळे, आमदार श्री  गौतम चाबुकस्वार, आमदार श्री. महेश दादा लांडगे, आमदार श्री. लक्ष्मण जगताप, उपमहापौर श्री. सचिन चिंचवडे, सभापती स्थायी समिती श्रीमती. ममता गायकवाड, सत्तारूढ पक्ष नेते श्री. एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते श्री. दत्तात्रय साने, क्रीडा सभापती श्री. संजय नेवाळे, आयुक्त श्री. श्रावण हर्डीकर महानगरपालिकेचे सर्व सदस्य तसेच  पदाधिकारी  यांचे उपस्थितीत संपन्न होणार आहे. अशी माहिती  काल पिंपरी येथे पत्रकार परिषद घेऊन  क्रीडा सभापती श्री. संजय नेवाळे यांनी दिली. यावेळी नगरसेविका सुजाताताई पालांडे व क्रीडा विभागाचे मान्यवर उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांचा देशभक्तीवर गाण्यांचा कार्यक्रम महानगरपालिकेच्या शालेय विद्यार्थ्यांचा देशभक्तीवर गाण्यांचा कार्यक्रम Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on January 23, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.