Seo Services
Seo Services

सोलापूर येथील डोळ्याचे पारणे फेडणारा अक्षता सोहळा


महेश आनंदा लोंढे (संपादक)

सोलापूर : सत्यम, सत्यम, दिड्यम, दिड्यमचा मंत्रोच्चार, शिवयोगी सिध्देश्‍वर महाराज की जयचा नामघोष, उंचच उंच मानाचे सात नंदीध्वज आणि बाराबंदी परिधान केलेले असंख्य सेवेकरी  सिद्धेश्‍वर मंदिर आणि परिसरातील सम्मती कट्ट्याजवळ आलेल्या लाखो भाविकांच्या साक्षीने डोळ्याचे पारणे फेडणारा अक्षता सोहळा आज सोमवारी संपन्न झाला. 

संमती पंचकट्याजवळ लोटलेल्या भाविकांच्या भक्तीला उधाण आले होते. लहान लहान मुले लहान नंदीध्वज घेऊन पुढे मिरवणूक काढत होते. बोला हर्र .. बोला हर्र .. सिद्धेश्‍वर महाराज की जय जयघोषाणे सारा परिसर दुमदुमून गेला होता. नऊशे वर्षापासून चालत आलेल्या सिद्धेश्‍वर महाराजांच्या योगदंडाची  (काठी) प्रतीक असलेल्या नंदीध्वजाच्या अक्षता सोहळ्यास महाराष्ट्रसह कर्नाटक राज्यातून आलेल्या भाविकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती.

रविवारी सिद्धेश्‍वरांनी (सोन्नलगी) सोलापुरात स्थापन केलेल्या ६८ लिंगाच्या नंदीध्वज मिरवणुकीने तैलअभिषेक घालून रात्री उशीरा मानाचे सात नंदीध्वज उत्तर कसब्यातील हिरेहब्बू यांच्या वाड्यात विसावले. सोमवारी सकाळी साडे सात वाजता, मानाच्या पहिल्या नंदीध्वजाची पूजा हिरेहब्बू तर दुसरी पूजा देशमुख यांच्याहस्ते भक्तीपूर्ण वातावरणात करण्यात आली. सकाळी साडे सात वाजता हिरेहब्बू यांच्या वाड्यातून विविधरंगी फुलांनी सजवलेले सातही नंदीध्वज संस्कारभारतीने काढलेल्या रंगीबेरंगी रांगोळीवरून मानकरी हिरेहब्बू बंधू व नंदीध्वज अक्षता  सोहळ्यासाठी सिद्धेश्‍वर मंदिराकडे मार्गस्थ झाले. या सातही नंदीध्वजास फुलांचे मोठे हार व मोठे बासिंग बांधण्यात आले होते.तर दारोदारी महिला नंदीध्वजाच्या पूजा व बाशिंग बांधण्यासाठी मोठी गर्दी केली होती. 

मिरवणुक पुढे समतेचा पंचाचार्‍याचा पंचरंगी ध्वज नंतर सनई, चौघडा, हलग्या हे सवाद्य होते तर सागर नाशिक ढोल,हळदे ब्रास बॅन्ड,राजकमल ब्रास बॅन्ड,प्रविण हक्के बंन्धुंचे हलग्याच्या तालावर घोडे नाचत होते. आदी सहभागी झाले होते.  त्यापाठोपाठ मोठ्या डौलाने डुलणारे मानाचे सात नंदीध्वज मार्गक्रमण करीत होते. पांढराशुभ्र पोशाख असलेला बाराबंदी धोतर, पांढरा फेटा परिधान करून लाखो भाविक मिरवणुकीत सहभागी झाले होते. हिरेहब्बू वाडा दत्त चौक, दाते गणपती, सोन्या मारुती,माणिक चौक, विजापूर वेस या मार्गे दुपारी १२ वाजता मानाचे सात नंदीध्वज संमती कट्याजवळ आले. १२:५ सुगडी पूजनाने धार्मिक विधिंना सुरुवात झाली. संमती कट्ट्यावर शेटे यांनी १२:३५ वाजता पहिली मंगलष्टा सुरूवात होऊन १२:४५ वाजता नंदीध्वजाचा व कुंभारकन्येचा अक्षता सोहळा संपन्न झाला. मंदिर परिसरात विवाह सोहळ्याच्या निमित्ताने जमलेल्या हजारो भाविकांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. या विवाह सोहळ्यापूर्वी वैदमूर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ,  व प्रा.डॉ. भीमाशंकर बिराजदार यांनी आपल्या रसाळ वाणीतून उपस्थित भाविकांना व माहिलांना मार्गदर्शन आणि सूत्रसंचालन केले. अक्षता संपल्यावर मानाचे सात नंदीध्वज अमृत लिंगाजवळ आले असता अमृत लिंगाची पंचअमृत अभिषेकाने विधिवत पूजा केली. त्यानंतर शेटे व अन्य मानकरांकडे हिरेहब्बू यांनी विडा दिला त्यानंतर सिद्धेश्‍वरांच्या गदगीस अभिषेक करून हिरेहब्बू यांनी विधिवत पूजा केली. शेटे यांना विडयाचा मान देण्यात आला. पूजेनंतर सातही मानाचे नंदीध्वज  सिध्देश्‍वर मंदिरात विसावले. तर दुपारनंतर सातही नंदीध्वज 68 लिंग प्रदक्षिणा शहरात घालण्यासाठी मार्गस्थ झाले.पोलीस प्रशसनाच्या वतीने चोख पोलीस बंन्दोबस्त लावण्यात आला होता.
सोलापूर येथील डोळ्याचे पारणे फेडणारा अक्षता सोहळा सोलापूर येथील डोळ्याचे पारणे फेडणारा अक्षता सोहळा Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on January 14, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.