Seo Services
Seo Services

घरकुल नामकरन वरून घरकुल धारकांचा उपोषणाचा इशारा. सुधाकर धुरी


स्वस्तिक आवटे

चिखली : "घरकुल ऑफ फेडरेशन" व घरकुल मधिल सर्व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना सर्व प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व उपस्थित सोसायटी कमिटी मेंबर्स व सर्व घरकुलवासियं यांच्या. ०८/०१/२०१९ रोजी पार पडलेल्या सभेत सत्ताधारी राजकारण्यांनी संपूर्ण घरकुलच्या नामकरणाचा जो घाट घातला होता. त्याला आपण सर्वांनी विरोध दर्शविला त्याबद्दल आपल्या सर्वांचे फेडरेशन ऑफ घरकुलच्या वतीने अभिनंदन करतो व जो आपण ठराव केला. की घरकुलला कोणाही एका जाती धर्माच्या व्यक्तीच, महापुरुषांच, महामानवांच, किंवा कोणाही राजकीय व्यक्तीच नाव हे आपल्या घरकुलला देऊ नये. अशा पद्धतीचा ठराव आपण बहुमताने मंजूर केला. व त्या ठरावा प्रमाणे घरकुलचे नामकरण हे प्रचलित नावाप्रमाणेच " घरकुल नवनगर संकुल " व मुख्य प्रवेशद्वाराचे नामकरण "घरकुल मुख्य प्रवेशद्वार" करण्याबाबत निर्णय घेण्यात आला व आपण फेडरेशनच्या माध्यमातून व पत्रकारीतेच्या माध्यमातून आवाज उठवण्याच काम आपण गेल्या चार पाच दिवसात आपण केलं. हे करत असताना आपण प्रशासनाच्या हे ही लक्षात आणून दिलं की आता घरकुलवासियांना  विश्वासात न घेता काहीही चालणार नाही व तसा पत्रव्यवहार पण आपण केला आणि आपण  आपला विरोध नोंदविला आहे. तरीपण कोणी या बाबतीत काहीही बोलायला तयार नाही. आपण प्रभाग समितीने केलेला ठराव दुरूस्त करण्याची विनंती आपण केलेली आहे.  जर  हा ठराव प्रभाग समितिने दुरुस्त केला नाही. तर येत्या २०/०१/२०१९ रोजी "फेडरेशन ऑफ घरकुल" व विविध संघटना व सर्व घरकुलवासियं मिळून घरकुल मुख्य प्रवेशद्वारावर एक दिवशीय उपोषण करणार आहोत. याची जाणीव प्रशासनाला करून दिली आहे. व त्या प्रमाणे आपण येत्या २०/०१/२०१९ तारखेला सर्व घरकुलवासियं मिळून घरकुल नामकरणास विरोध म्हणून एक दिवशीय उपोषण करणार आहोत. तरी या उपोषणात आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे व आपली एकी काय करू शकते याची जाणीव आपल्याला करून द्यायची आहे. तरी आपणास सर्वांना विनंती आहे की आपण येत्या २०/०१/२०१९ रोजी सकाळी 9:00 वाजता घरकुल मुख्य प्रवेशद्वारावर सर्व उपस्थित राहतील. उपोषण सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहील.
   
तसेच हे सर्व करत असताना कूठेही कोणाला त्रास होणार नाही, वाहतूक कोंडी होणार नाही. कायदा व सुव्यवस्थेला तडा जाणार नाही. याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. आंदोलन हे शांततेच्या मार्गाने आपणास करायचं आहे. या आंदोलन काळात आपण झोपलेल्यांना जाग करण्यासाठी व आपली बाजू परखडपणे मांडण्यासाठी मीडियाला देखील आमंत्रित करणार आहोत. फेसबुकवर लाईव्ह च्या माध्यमातून पण आपण आवाज उठवणार आहोत. या सर्व गोष्टींची तयारी फेडरेशन कडून पूर्ण झाली आहे. फक्त आपल्या सर्वांच्या ऐकत्रित येऊन आंदोलन करायची गरज आहे.
असे आवाहन घरकुल धारकांना व घरकुलमधील सर्व संघटनांना फेडरेशन ऑफ घरकुलचे अध्यक्ष सुधाकर धुरी यांनी केले आहे.
घरकुल नामकरन वरून घरकुल धारकांचा उपोषणाचा इशारा. सुधाकर धुरी घरकुल नामकरन वरून  घरकुल धारकांचा  उपोषणाचा इशारा. सुधाकर धुरी Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on January 15, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.