Seo Services
Seo Services

थंडीमध्ये घरकुल चे वातावरण तापले


स्वस्तिक आवटे (उप संपादक)

चिखली : गेले काही दिवसांपासून घरकुलच्या नावावरून नवीन वाद पेटला आहे. आणि हा वाद घरकुल आणि सत्तारूढ यांच्यामध्ये अतिशय टोकाला गेलेला दिसत आहे. सत्तारूढ पक्ष नेत्यांनी घरकुल चे नामकरण करून   "स्व.गोपीनाथराव मुंडे नगर" असे प्रभाग समिती बैठकीत ठराव मंजूर केला आहे. आणि यावेळी  घरकुल मधील लोकांना विश्वासात न घेता हा ठराव मंजूर करून घेतला आहे. याची माहिती मिळताच "फेडरेशन ऑफ घरकुल"ने तातडीची ०८/०१/२०१९ तारखेला तातडीची बैठक बोलावून सर्वांना माहिती दिली. त्यामुळे घरकुलकर आणि घरकुल मधील विविध संघटनांनी एकत्र येऊन याचा निषेध केला व एक मताने घरकुलाचे नावं बदलणार नाही असा ठराव बैठकीत ऐक मताने मंजूर झाला. तसे पत्र देखील महानगरपालिकेला देण्यात आले. परंतु, यावर कोणीही दखल न घेतल्यामुळे या निषेधार्थ येत्या २०/०१/२०१९ तारखेला घरकुलवासियांकडून आंदोलन छेडण्यात आले आहे. परंतु, सत्तारूढ पक्ष नेत्यांनी काल एका वृत्तपत्रात दिलेल्या माहितीनुसार असं  निदर्शनात आणून दिलं जातय की, हा वाद इतका मोठा नाही. त्यांनी वृत्तपत्राला असं म्हंटले आहे कि सात-आठ लोकांचा या नावाला विरोध आहे आणि त्यांना राजकारण करायचे आहे. जर लोकांचा नावाला विरोध असेल तर मतदान घ्यावं अस सत्तारूढ पक्ष नेत्यांनी म्हटले आहे. यामुळे सोशल मीडियावर पक्षनेत्यांचे आवाहन स्वीकारतो. आणि त्यांचा निषेध करतो, आशा घरकुलधारकांच्या प्रतिक्रीया येत आहेत. "स्व.गोपीनाथराव मुंडे नगर" या नावाला विरोध करत "घरकुल"चे नाव "घरकुल"च राहील, आशी मागणी घराकुलमधील लोक करताना दिसत आहे. हा विषय जर ताणून ठेवला तर याचा परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ शकतो.अस जाणकारांचे मत आहे.
थंडीमध्ये घरकुल चे वातावरण तापले थंडीमध्ये घरकुल चे वातावरण तापले Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on January 17, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.