Seo Services
Seo Services

घरकुल मधे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण


स्वस्तिक आवटे (उप संपादक)

चिखली : "घरकुल नवनगर संकुल" आणि "घरकुल महाप्रवेशद्वार" हेच नाव असाव यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला प्रथम राष्ट्रगीत आणि घरकुलची अखंडता एकात्मता राखण्यासाठी संविधान प्रार्थनेने सुरवात झाली. यानंतर फेडरेशनचे अध्यक्ष सुधाकर धुरी यांनी घरकुलकरांच्या  मुख्य मागण्या व्यक्त केल्या आणि सत्तधाऱ्याना  खुल्ल आव्हान केलं की,  घरकुलमधून नामकरणास तुम्ही मतदान घेऊनच दाखवा. कारण घरकुल मधील जनता आता तुम्हाला आणि तुमच्या हुकुमशाहीला जुमानार नाही व सत्ताधारी नेत्यांनी सांगितलं होत की, सात आठ लोकांचा  "स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे " या नावाला विरोध आहे. परंतु, आज आपण येथे येऊन पाहा की हा शेकडोने जनसमुदाय एकत्र येऊन सांगत आहे की, सात आठजण विरोधात नसून सर्व घरकुलकर आपला निषेध करत आहेत. यानंतर अनेक मान्यवरांनी आपले मनोगत मांडून घरकुल नागरिकांनी आपला प्रभाग समितीच्या निर्णयाचा निषेध केला. राजकीय नेत्यांनी नावे दयायचीच असेल तर ते तुमच्या घरांना द्यावीत आमच्या घरांसाठी नाही. असा सल्लादेखील स्थानिक राजकीय नेत्यांना दिला. या पद्धतीने तिरस्कार व्यक्त करून निषेध नोंदवला. आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, तसेच हे आंदोलन सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालेल ही माहिती यावेळी आयोजकांनी दिली.
घरकुल मधे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण घरकुल मधे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on January 20, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.