Seo Services
Seo Services

लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाला विरोध कायम


स्वस्तिक आवटे (उप संपादक)

चिखली : पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या घरकुलचे नामकरणवरून दिनांक २०/०१/२०१९ रोजी फेडरेशन ऑफ घरकुलच्यावतीने निषेध सभा आणि एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जेएनएनयूआरएमअंतर्गत चिखली येथे आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी गृहप्रकल्पाचे काम सुरु आहे. एकशे साठ इमारती उभारुन सहा हजार सातशे वीस सदनिका बांधल्या जाणार आहेत. त्यापैकी आत्तापर्यंत एकशे चोवीस इमारतींची उभारणी झाली असून त्यामध्ये पाच हजार दोनशे आठ लाभार्थी राहत आहे. उर्वरित प्रकल्पाचे काम सुरु असून हा प्रकल्प ‘घरकुल’ या नावाने ओळखला जातो.

या प्रकल्पाचे नामांतरण करण्याचे सत्ताधारी भाजपच्या विचाराधीन आहे. घरकुल प्रकल्पाचे "स्वर्गीय  लोकनेते गोपीनाथराव  मुंडे नगर" करण्याचा विचार आहे. परंतु, या नामकारणाला घरकुलवासियांनी विरोध दर्शविला आहे. घरकुलवासियांना विश्वासात न घेता नामांतरणाचा घाट घातला जात आहे. ही एकाधिकारशाही आहे. फेडरेशन आणि घरकुलधारकांना "स्वर्गीय गोपीनाथ राव मुंडे" यांच्याविषयी नितांत आदर आहे. परंतु, भविष्यात या नावावरुन वादविवाद, जातीपातीचे राजकारण होऊ शकते. सलोख्याचे वातावरण दूषित होऊ शकते. त्यामुळे जातीपातीशी निगडीत कोणत्याही व्यक्तीचे नाव किंवा महापुरुषाचे नाव न देता ‘घरकुल नवनगर संकुल’ असे सर्वसमावेशक नाव देण्यात यावे,  त्याचप्रमाणे भविष्यात घरकुल मध्ये तयार होणाऱ्या विकास कामांना उदाहरणार्थ दवाखाना, सांस्कृतिक भवन, भाजी मंडई, ग्रंथालय यांना  घरकुल सांस्कृतिक भवन, घरकुल भाजी मंडई, घरकुल ग्रंथालय अशा पद्धतीने नावे देण्यात यावी अशी मागणी घरकुलवासियांनी केली आहे.

याबाबत महापौर, आयुक्त, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, ‘फ’ प्रभाग अध्यक्ष यांना निवेदन देण्यात आले आहे.

जाती-धर्मातील विविधतेत नटलेल्या या घरकुल संकुलामध्ये सलोखा-बंधुता-एकता आणि राष्ट्र एकात्मता कायमस्वरुपी टिकवून रहावी. शांतता नांदावी, लोकशाही विरोधी राजकारण्यांना जाब विचारण्यात यावा, यासाठी फेडरेशन ऑफ घरकुलतर्फे आज  निषेध सभा आणि एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले आणि या निषेध सभेमध्ये घरकुल ऑफ फेडरेशन, मदरसा हस्नैन घरकुल, महात्मा फुले जनसेवा मंडळ, संविधान दिन सोहळा समिती, सम्यक क्रांती महासंघ, समस्या निवारण समिती, जागृत नागरी महासंघ, घरकुल अपंग सहाय्य संस्था, घरकुल खान्देश जनसेवा मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, सातारा मित्रपरिवार घरकुल, शिवतीर्थ प्रतिष्ठान, शिवरक्त प्रतिष्ठान, संघर्ष प्रतिष्ठान, शिवशौर्या प्रतिष्ठान, घरकुल प्रतिष्ठान, समता समाज सेवा प्रतिष्ठान,संकट मोजन प्रतिष्ठान, युवा गर्जना व सर्व महिला बचत गट, क्षत्रिय कुलवंत प्रतिष्ठान, जगदंब प्रतिष्ठान आदींनी या निषेध सभेत भाग घेतला.
लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाला विरोध कायम लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाला विरोध कायम Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on January 20, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.