Seo Services
Seo Services

छत्रपती शिवाजी महाराज जयंती

Image result for छत्रपती शिवाजी महाराज

पिंपरी - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा व त्यांच्या कार्यांचा प्रचार व प्रसार होण्याकरिता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने रविवार दि. १७ फेब्रुवारी २०१९ ते मंगळवार दि. १९ फेब्रुवारी २०१९ या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज समाज प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्याचे नियोजन आहे. या कार्यक्रमाच्या सुयोग्य नियोजनासाठी शुक्रवार दि.१५ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी ४.०० वा. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील स्थायी समिती सभागृह येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी व पिंपरी चिंचवड शहरातील शिवप्रेमी संघटना, गणेश मंडळे ,जेष्ठ नागरिक संघ, पोलीस मित्र संघटना, सामाजिक संस्था यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महापौर राहुल जाधव व पक्षनेते एकनाथ पवार यांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती छत्रपती शिवाजी महाराज जयंती Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on February 15, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.