Seo Services
Seo Services

सरदार सरोवर प्रकल्प बाधितांना दिलेल्या नागरी सुविधांचे उन्नतीकरण करण्याचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांचे निर्देश


मुंबई : नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्पातील प्रकल्पबाधितांचे आदर्श पुनर्वसन झाले आहे. या प्रकल्पबाधितांना पुरविण्यात आलेल्या सुविधांचे उन्नतीकरण करावे, असे निर्देश मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी आज येथे दिले.

सरदार सरोवर प्रकल्पातील पुनर्वसनासंबंधीची समन्वय बैठक आज मंत्रालयात श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी नर्मदा नियंत्रण प्राधिकरणाचे माजी सदस्य व राज्य शासनाचे सल्लागार डॉ. अफरोज अहमद, विभागाचे सहसचिव शामसुंदर पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

सरदार सरोवर प्रकल्प बाधित आदिवासी समाजाला दिलेल्या सिंचन,आरोग्य, मत्स्य व्यवसाय विकास व संवर्धन आणि नागरी सुविधांचा यावेळी आढावा घेण्यात आला. प्रकल्पबाधित आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. या प्रकल्पातील पुनर्वसन अतिशय चांगल्या प्रकारे झाले आहे. या पुनर्वसनाची यशोगाथा इतर प्रकल्पांसाठी मार्गदर्शक ठरावी, यासाठी त्याचे चित्रीकरण करण्यात यावे, असेही या बैठकीत ठरविण्यात आले.
सरदार सरोवर प्रकल्प बाधितांना दिलेल्या नागरी सुविधांचे उन्नतीकरण करण्याचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांचे निर्देश सरदार सरोवर प्रकल्प बाधितांना दिलेल्या नागरी सुविधांचे उन्नतीकरण करण्याचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांचे निर्देश Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on February 21, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.