Seo Services
Seo Services

घरकुलकरांच्य आवाजाने पालिका हादरली




स्वस्तिक आवटे(उप संपादक)

पिंपरी : पिंपरी चिंचवड मधील घरकुलकरांचे "स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे नगर" या नावासाठी विरोधी भूमिकेत आंदोलन चालू आहे. परंतु, याकडे कोणीही जाणीवपूर्वक लक्ष घालत नसल्या कारणाने "फेडरेशन ऑफ घरकुल" आणि घरकुल मधील नागरिकांनी पालिकेमध्ये येऊन पालिका भवनात मुख्य दरवाजासमोर पायऱ्यांवर बसून तीव्र आंदोलन केले. "घरकुल नवनगर संकुल झालाच पाहिजे" "घरकुल आमच्य हक्काचे नाही कोणाच्या बापच" एकजुटीचा विजय असो" "कोण म्हणतंय देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही" आशा आवाजात घोषणा दिल्या आणि आपला संताप व्यक्त केला. यामुळे पालिका भवन काही तास घोषणाने दुमदुमले. आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले.  कोणालाच काही समजले नाही की येवढे लोक अचानक आले कसे. एवढी सुरक्षा योजना असताना देखील मोर्चा आत आला कसा? यामुळे सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आज पालिकेची जनरल बैठक असल्याकारणाने सर्व नगरसेवक उपस्थित होते. हे औचित्य साधून धडक मोर्चा पालिकेत नेऊन घरकुलकरांनी सत्ताधाऱ्यांची कानउघडनी केली. यावेळी काही विरोधी नगरसेवकांनी आपला पाठींबा "फेडरेशन ऑफ घरकुल" ला दिला. महापौर यांनी यावर लवकरात लवकर चर्चा करून मार्ग काढू असं  आश्वासन दिलं.
घरकुलकरांच्य आवाजाने पालिका हादरली घरकुलकरांच्य आवाजाने पालिका हादरली Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on February 04, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.