पिंपरी : शहरातील बेरोजगारांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्याकरिता चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने वार्ड चलो अभियान कार्यक्रमचे आयोजन चिंचवडमध्ये करण्यात आले. या प्रसंगी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सचिन साठे यांनी जमलेल्या युवकांना मार्गदर्श केले. सचिन साठे यांनी आपल्या भाषणात मोदी व भाजपा सरकारवर अनेक आरोप करीत ताशेरे ओढले.
काँग्रेसने आपल्या काळात गरिबी हटावचा नारा दिला व आपल्या योजनांनी तो यशस्वी पण करून दाखविला. स्व. इंदिरा गांधींनी बँकांचे राष्ट्रीयकरण करून शासकीय योजनांचा लाभ सामान्य जनतेला मिळून दिला. आणि नरेंद्र मोदींनी गरिबांनाच हटाओचा कार्यक्रम केला. अंबानी,अडाणी, मल्ल्या, मोदी या लोकांसाठी नरेंद्र मोदींनी काम केले आहे. त्यांना राजाश्रय असल्याशिवाय देशातील जनतेचे हजारो करोड रुपये घेऊन पळून जाणे शक्य नाही. हे राजाश्रय देण्याचे काम हे मोदी आणि भाजप सरकारने केले आहे. या लोकांना, भाजपाला आता त्यांची खरी जागा दाखविण्याची वेळ आली आहे, असे सचिन साठे यांनी सांगितले.
तसेच गेले अनेक वर्षे आपण ऐकत आहोत, मंदिर वही बनायेंगेचा नारा भाजपा देत आहेत. परंतु, तो नारा सत्यात उतरत नाही. म्हणजे केवळ सामान्य नागरिकांच्या भावनांशी खेळायचं काम भाजपा करीत आहे .फक्त खोट बोलून मते मिळवायची व मनाप्रमाणे कामे करायची. मुह मे राम आणि मन मे नथुराम असे यांचे आहे, देशामध्ये जाती-धर्मात वाद निर्माण करायचे आणि स्वत:च्या सत्तेची पोळी भाजून घ्यायची हाच कार्यक्रम भाजपाचा आहे, बाकी काही नाही असे साठे यांनी सांगितले
जर २०१९ ची निवडणूक दुर्दयवाने भाजपाने जिंकली तर या पुढे निवडणुका होणार नाही, हे अत्यंत जाणीव पूर्वक सांगतो, याचे कारण देशातील प्रत्येक,आर.बी.आय. असेल, सी.बी.आय. असेल, सर्वोच न्यायालय असेल, स्वायत्त संस्थेमध्ये भाजपाने हस्तक्षेप केला आहे. हि देशसाठी धोक्याची घंटा आहे असे. हि साठे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
पुढे सचिन साठे यांनी सांगितले जर आपल्याला येणाऱ्या पिढीचे उज्वल भविष्य पाहायचे असेल तर काँग्रेस पक्षाला साथ द्या, काँग्रेस पक्षाला येणाऱ्या निवडणुकीत मतदान करा, असे आवाहन करीत काँग्रेस पुन्हा सत्तेत येणं अत्यंत आवश्यक आहे. असे सचिन साठे यांनी सांगितले.
या चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसवतीने आयोजित वार्ड चलो अभियान कार्यक्रमात युवाशक्ती कार्ड माध्यमातून बेरोजगार युवकांची नोंदणी करण्यात आली, तसेच या युवाशक्तीसोबत नाव नोंदणीकरिता बेरोजगार युवकांनी ९९१०२२२०१९ या मोबाईल नंबरवर मिस कॉल करण्याचे आवाहन या वेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस मयूर जैस्वाल यांनी युवकांना केले.
काँग्रेसने गरिबी हटाओचा नारा दिला होता, पण भाजपाने गरिबांनाच हटवाचे काम केले आहे - सचिन साठे
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
February 26, 2019
Rating:
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
February 26, 2019
Rating:

No comments: