Seo Services
Seo Services

देशातील महत्वाच्या 91 धरणांमधील पाणीसाठ्यात 2 टक्क्यांनी घट

Image result for धरणांमधील

नवी दिल्लीदेशातील महत्त्वाच्या 91 धरणातल्या जलसाठ्यांमध्ये 20 मार्च 2019 रोजी संपलेल्या आठवड्यात 54.002 अब्ज घनमीटर पाणी शिल्लक असूनएकूण साठवणूक क्षमतेच्या ते 33 टक्के इतके आहे.
या जलसाठ्यांची एकूण साठवणूक क्षमता 161.993 अब्ज घनमीटर इतकी आहे. 91 पैकी 37 जलसाठ्यांवर 60 मेगावॅट पेक्षा जास्त क्षमतेचे जल विद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
पश्चिम विभागात महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश असून, यामध्ये 27 धरणांचा समावेश आहे. त्यांची एकूण जल साठवण क्षमता 31.26 अब्ज घनमीटर आहे. या साठ्यांमध्ये सध्या 7.08 अब्ज घनमीटर पाणी उपलब्ध आहे. धरणांच्या साठवणूक क्षमतेपैकी 23 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
हिमाचल प्रदेशपंजाबउत्तराखंडमध्य प्रदेशकर्नाटकआणि तामिळनाडू या राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला जलसाठा उपलब्ध आहे.
राजस्थान, झारखंडओदिशापश्चिम बंगालत्रिपुरागुजरातमहाराष्ट्रउत्तर प्रदेश आणि केरळ  या राज्यांतील जलसाठ्यांमधील पाण्याचे प्रमाण गतवर्षाच्या तुलनेत कमी आहे.
देशातील महत्वाच्या 91 धरणांमधील पाणीसाठ्यात 2 टक्क्यांनी घट देशातील महत्वाच्या 91 धरणांमधील पाणीसाठ्यात 2 टक्क्यांनी घट Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 22, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.