भोसरी : भोसरीतील अण्णासाहेब मगर सहकारी बँकेत कर्जवाटप, आर्थिक व्यवहारामध्ये रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बँकेतील पदाधिका-यांचे राजीनामासत्र सुरु झाले आहे. बँकेचे अध्यक्ष नंदकुमार लांडे यांनी तडकाफडकी अध्यक्ष आणि संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता उपाध्यक्ष विठ्ठल सांडभोर यांनी राजीनामा दिल्याचे समोर आले आहे.
अण्णासाहेब मगर सहकारी बँकेत कर्जवाटप, आर्थिक व्यवहारामध्ये रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच बँकेचे अध्यक्ष नंदकुमार लांडे अधिनियमाचे कलम 73 क अ (1) (एक) (क) (एक) नुसार कसूरदार ठरले असून बँकेचे संचालक राहण्यास अपात्र ठरल्याचे सकृतदर्शनी दिसून येत असल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्र राज्य सहकारी संस्थेचे अप्पर निबंधक डॉ. किशोर तोष्णिवाल यांनी लांडे यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली होती. तसेच 20 मार्च 2019 रोजी होणा-या सुनावणीस हजर राहण्याचे निर्देश दिले होते.
सांडभोर यांनी 8 मार्च 2019 रोजी राजीनामा दिला आहे. वैयक्तीक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांचा राजीनामा बँकेच्या सभेने मंजुर देखील केला आहे. पुढील कार्यवाही करण्यासाठी याबाबतची माहिती सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र, पुणे जिल्हा उपनिबंधक, सहकारी निवडणूक प्राधिकरण यांना कळविण्यात आली आहे.
अण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे उपाध्यक्ष विठ्ठल सांडभोर यांनी दिला राजीनामा
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 17, 2019
Rating:
No comments: