Seo Services
Seo Services

जम्मू-काश्मीरमध्ये सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच





जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्ताननं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यात एक भारतीय जवान शहीद झाला आहे. हरी वाकर असं शहीद झालेल्या जवानाचं नाव आहे. वाकर हे मूळचे राजस्थानमधील रहिवासी होते. 


मिळालेल्या माहितीनुसार, जम्मूच्या पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. यात जवान हरी वाकर शहीद झाले. स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार, शनिवारी संध्याकाळी पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या गोळीबारात वाकर जखमी झाले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.


पाकिस्तानी सैन्यानं शनिवारी पुंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ भारतीय लष्कराच्या चौक्यांना लक्ष्य केले. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. त्यांनी शाहपूर आणि केरनी परिसराला लक्ष्य केलं, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली. 
जम्मू-काश्मीरमध्ये सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच जम्मू-काश्मीरमध्ये सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 24, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.