Seo Services
Seo Services

भेसळयुक्त विदेशी दारुच्या कारखान्यावर छापा; ११ लाखांचा माल जप्त



पुणे : पिंपळे गुरव येथील बँक ऑफ महाराष्ट्रासमोर सुरु असलेल्या भेसळयुक्त विदेशी दारुच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने छापा मारला. यामध्ये ११ लाख ३९ हजार ५०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. 

नागा डाया चावडा (वय ३५, रा. पिंपळे गुरव, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आऱोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९चे कलम ६५ ए, इ, ड, ८१, ८३, ९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पिंपळे गुरव येथे सापळा रचून अटक केली. त्याच्या जवळील मोटारसायकलीमध्ये एक लिटरच्या दोन स्कॉचच्या बाटल्या मिळून आल्या. 

पथकाला त्या बाटल्यांवर संशय आला. त्यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्या घराची झडती घेतली असता तो उच्चप्रतिच्या विदेशी स्कॉचच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये कमी प्रतीचे विदेशी मद्य अवैधरीत्या भरत असल्याचे आढळून आले. घरामध्ये विविध ब्रॅण्डच्या उच्च प्रतीचे विदेशी मद्याच्या एक लिटर क्षमतेच्या ६७ भरलेल्या बाटल्या तसेच सुमारे ५०० रिकाम्या बाटल्या, २००० बुच्चन २६० लेबल व ९५० कव्हर असा एकूण ११ लाख ३९ हजार ५०० रुपयांचा माल मिळून आला.
भेसळयुक्त विदेशी दारुच्या कारखान्यावर छापा; ११ लाखांचा माल जप्त भेसळयुक्त विदेशी दारुच्या कारखान्यावर छापा; ११ लाखांचा माल जप्त Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 19, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.