Seo Services
Seo Services

वीज मीटररीडिंग पारदर्शकता येण्यासाठी ग्राहकांना मोबाईलवरून पूर्वसूचना

Image result for वीज मीटररीडिंग


पुणे मीटररीडिंग आणि वीजबिलात अचूकता व पारदर्शकता राहावी, यासाठी आता मीटरचे रीडिंग कोणत्या तारखेला आणि किती वाजता घेण्यात येणार आहे, याची पूर्वसूचना महावितरणकडून ग्राहकांना मोबाईलवरून अगोदर एसएमएसद्वारे दिली जाणार आहे.

महावितरणने ऑगस्ट २०१६ पासून मोबाईल ॲपद्वारे मीटररीडिंग घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या वीजबिलात मोठ्या प्रमाणात अचूकता आली आहे. आता वीज मीटररीडिंग प्रक्रियेत ग्राहकांना आपले मीटररीडिंग तत्काळ तपासता यावे म्हणून महावितरणकडे नोंदणी केलेल्या अधिकृत मोबाईलवर ग्राहकांना मीटररीडिंगच्या पूर्वसूचनेचा एसएमएस देण्यात येणार असून, यात सकाळी ८ ते १०, १० ते १२ दुपारी १२ ते ३ आणि ३ ते ५ यादरम्यान कोणत्या वेळेत रीडिंग घेतले जाणार आहे, याची माहिती दिली जाणार आहे. यामुळे ग्राहकांची गैरसोय टळणार असून, रीडिंग घेण्याच्या वेळेस ग्राहकांना उपस्थित राहून योग्य रीडिंग घेतले जात आहे अथवा नाही, याची खातरजमा करता येणे शक्‍य होणार आहे.

याशिवाय, महावितरणकडून राबविण्यात येत असलेल्या इतरही विविध उपक्रमांची माहिती ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर दिली जाते. त्यामुळे ज्या ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या अधिकृत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली नसेल; अशा ग्राहकांनी आपल्या नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून ९२२५५९२२५५ क्रमांकावर MREG स्पेस, बारा अंकी ग्राहक क्रमांक अशी माहिती टाईप करून एसएमएस केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय २४x७ सुरू असणाऱ्या कॉल सेंटरचे १९१२ किंवा १८००१०२३४३५ आणि १८००२३३३४३५ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहेत. तसेच www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
वीज मीटररीडिंग पारदर्शकता येण्यासाठी ग्राहकांना मोबाईलवरून पूर्वसूचना वीज मीटररीडिंग पारदर्शकता येण्यासाठी ग्राहकांना मोबाईलवरून पूर्वसूचना Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 23, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.