पिंपरी: शिरूर लोकसभा मतदार संघ मधील राष्ट्र्वादीचें संभाव्य उमेदवार विलास लांडे कि, परवा राष्ट्रवादीत दाखल झालेले अमोल कोल्हे या पैकी राष्ट्रवादी कोणाला उमेदवारी देते या कडे सर्वांचेच लक्ष लागले असताना येत्या ५ मार्च ला दिग्ग्ज राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाषणांची तोफ भोसरीतील गाव जत्रा मैदानावर धडाडणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज अशा दोन्ही भूमिका साकारून अमोल कोल्हे घराघरात पोहचले आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी अमोल कोल्हे हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. अमोल कोल्हे यांच्या खास वकृत्वशैलीमुळे ते महाराष्ट्रभर परिचित आहेत. त्यांच्या प्रवेशाने आगामी शिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.
आगामी लोकसभेत चौकार ठोकण्यास सज्ज झालेल्या शिवसेनेला शह देण्यासाठी राष्ट्रवादीने व्युहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिरुरच्या आखाड्यात राष्ट्रवादीचे अजितदादा यांच्या खांद्यावर शिरुरसह मावळ लोकसभा ताब्यात घेण्याचे जोरदार प्रयत्न केले जाणार आहेत. ५ मार्च रोजी अजितदादा व अमोल कोल्हे काय बोलणार याकडे पिंपरी-चिंचवडसह शिरुर लोकसभेतीतील मतदाराचे लक्ष लागले आहे.
शिरुर लोकसभेसाठी ५ मार्चला भोसरीत सभा
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 04, 2019
Rating:
No comments: