Seo Services
Seo Services

शालांत परिक्षेत ८० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव


पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील विद्यालयातून शालांत परिक्षेत ८० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभ प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे महापौर राहुल जाधव यांच्या हास्ते संपन्न झाला.

विद्यार्थ्यांना  बालपणातच योग्य मार्गदर्शन लाभले तर, भविष्यात ते विद्यार्थी ऊंच शिखर गाठू शकतात, चांगला भविष्यकाळ तुमच्या शिक्षणातच दडला आहे. असे मत महापौर राहुल जाधव यांनी व्यक्त केले.

यावेळी महापौर राहुल जाधव  म्हणाले, आई – वडिलांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यात याव्यात, भविष्याची वाटचाल ही अटीतटीची आहे. आपल्या यशामुळे आई – वडिलांना वेगळयाच आनंदाची अनूभुती येते, यश प्राप्त करण्यासाठी कष्ट करावे लागतात, आणि इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही प्रकारच्या अडचणीवर मात करुन धेय्यपूर्ती करता येते  असेही ते म्हणाले.
     
यावेळी व्याख्याते प्रा.अरविंद नातू, प्रा.आनंद देसाई, आणि सचिन वाघ यांनी करियर मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षेची तयारी या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन पर व्याख्यान दिले.           
     
इयत्ता १० वी मधील विदयार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या १३४० विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार रुपये प्रमाणे  प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून २ कोटी लाख रुपयांचे वितरण डिजीटल पेमेंटव्दारे  करण्यात आले.

इयत्ता १० वी मधील विदयार्थ्यांना ८० ते ९० टक्के पर्यंत  गुण प्राप्त केलेल्या २६४१ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १० हजार प्रमाणे  प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून २ कोटी ६४ लाख १० हजार रुपयांचे वितरण डिजीटल पेमेंटव्दारे करण्यात आले.     

इयत्ता १२ वी मधील विद्यार्थ्यांना ८०  टक्के पेक्षा जास्त गुण संपादन केलेल्या ९४२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी १५ हजार प्रमाणे प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून १ कोटी ४१ लाख ३० हजार रुपयांचे वितरण डिजीटल पेमेंटव्दारे करण्यात आले.     
     
कार्यक्रमाच्या प्रारंभी पुलवामा येथील हल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी सत्तारुढ पक्षनेता एकनाथ पवार, महिला व बाल कल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे,  अ प्रभाग अध्यक्षा, अनुराधा गोरखे, ब प्रभाग अध्यक्षा, करुणा चिंचवडे, नगरसदस्या सुनिता तापकीर, शर्मिला बाबर, निर्मला कुटे, आरती चोंधे, आश्विनी चिंचवडे, आश्विनी जाधव, मिनल यादव, नगरसदस्य नामदेव ढाके, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्य्क आयुक्त स्मिता झगडे, अण्णा बोदडे, नागरवस्ती विकास योजना या विभागाचे समाजविकास अधिकारी संभाजी ऐवले, सुहास बहादरपुरे, माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थीनी, पालक व शिक्षक उपस्थित होते.
     
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांनी केले. तर सुत्रसंचालन बी.के.काकडे यांनी केले तर आभार अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी मानले.
शालांत परिक्षेत ८० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव शालांत परिक्षेत ८० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 05, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.