Seo Services
Seo Services

करसंकलन कार्यालये सुट्टीच्या दिवशीही राहणार सुरु

Image result for पिंपरी-चिंचवड महापालिका



पिंपरी : आर्थिक 2018-19 हे वर्ष 31 मार्च 2019 रोजी संपत असल्याने नागरिकांच्या सोईच्या दृष्टीने सर्व 16 कर संकलन विभागीय कार्यालये सार्वजनिक व साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही सुरु राहणार आहेत. 31 मार्चपर्यंत दरररोज कार्यालये सुरु राहणार आहेत. त्यामुळे ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मिळकत कराचा भरणा केलेला नाही. त्यांनी मिळकतकराचा भरणा करावा असे आवाहन महापालिकेने केले आहे.

नागरिकांच्या सोयीचे दृष्टीने साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीचे दिवशी सर्व करसंकलन विभागीय कार्यालये सुरु ठेवण्यात आली आहेत. मालमत्ताधारकांना कराची रक्कम रोख, धनादेश, डिमांड ड्राफ्टद्वारे भरणा करता येईल. या शिवाय महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर मिळकत कर भरणेकामी ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. मिळकत कराचा ऑनलाईन भरणा करणा-या मालमत्ताधारकांना सर्वसाधारण करात 2% सवलत लागू राहील. मिळकत कराचा भरणा करणेकामी मोबाईल ऍपची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील करसंकलन विभागाकडे 5 लाख 6 हजार 927 मालमत्तांची महापालिकेकडे नोंद आहे. त्यापैकी 2,90,316 मालमत्ताधारकांनी 397.50 कोटी मिळकतकराचा भरणा केला आहे. महापालिका हद्दीतील सर्व मालमत्ताधारक / भोगवटादार यांनी 31 मार्च अखेर मिळकत कराचा भरणा करुन दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन करसंकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रवीण अष्टीकर यांनी केले आहे.
करसंकलन कार्यालये सुट्टीच्या दिवशीही राहणार सुरु करसंकलन कार्यालये सुट्टीच्या दिवशीही राहणार सुरु Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 23, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.