पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा नियोजनांत बदल करण्यात यावा, अशी मागणी मानव कांबळे यांनी श्रावण हर्डीकर यांच्याकडे लेखी निवेदनांद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनांत त्यांनी म्हटले आहे की, मागील पंधरा दिवसापासून संपूर्ण शहरात आठवड्याचून एक दिवस पूर्ण पाणीपुरवठा बंद असे धोरण राबविण्यात येत आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. दररोज एक वेळ साधारण दोन तास असा पाणी पुरवठा करत असतो, तोच पुरवठा दररोज फक्त अर्ध्या तासाने कमी केला तर दर आठवड्याला एक दिवस पूर्ण कोरडा अशी स्थिती येणार नाही. नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरण्याची सवय लागेल. अजूनही काही भागामध्ये दोन्ही वेळा पुरवठा केला जात आहे.
महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांना या सर्व बाबींची माहिती आहे. परंतु 'विशिष्ठ' कारणांमुळे या वास्तवाकडे दुर्लक्ष केले जात आहे. या सर्व बाबींवर नियंत्रण आणले तर आताच्या टंचाईच्या काळातही शहरात योग्य दाबाने नियमितपणे दोन वेळ पाणीपुरवठा करता येईल. त्याचबरोबर महापालिकेच्या वतीने चालविण्यात येणारे पोहण्याचे तलाव ताबडतोब बंद करण्यात यावेत. प्रशासकीय कारभारातील गलथानपणा, बिल्डर लॉबी आणि राजकीय नेत्यांचे आर्थिक हितसंबंध, तसेच कर्तव्यात कसूर करणारे पालिका कर्मचारी यांची शिक्षा सामान्य करदात्या नागरिकाने का भोगावी? असेही म्हटले आहे.
महापालिकेने पाणीपुरवठा नियोजनांत बदल करावा
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 23, 2019
Rating:
No comments: