मुंबई : मंत्रालयातील सचिवाने आपल्या पत्नीवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत असलेल्या विजय पवार यांनी घरगुती वादातून काल रात्री आपल्या पत्नीवर २ गोळ्या झाडल्या. व त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली. पवार यांच्या पत्नीला रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दरम्यान, मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावचे रहिवासी असलेले विजय पवार हे तालुक्यातील पहिले जिल्हाधिकारी होते. नुकतीच त्यांची बदली कौशल्य विकास विभागात झाली होती.
मंत्रालयातील सचिवाची पत्नीवर गोळीबार करून स्वता: केली आत्महत्या
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 22, 2019
Rating:
No comments: