Seo Services
Seo Services

खेडमध्ये शिवसेनेला भाजपाची साथ मिळणार?

Image result for खेडमध्ये शिवसेनेला भाजपाची साथ मिळणार?



खेड : शिरूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा गड मानला गेला आहे. तर खेड विधानसभेतही शिवसेना आणि राष्ट्रवादीत 'टफ फाईट' रंगत आली आहे. यंदा लोकसभा निवडणुकीत माजी शिवसैनिक व या मतदारसंघाचा अभ्यास असलेले डॉ. कोल्हे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देऊन एक 'कांटे की टक्कर' लढत निर्माण केली आहे. त्यामुळे आढळराव यांना भाजप कार्यकर्त्यांनी एकदिलाने साथ दिली तर त्यांना चौकार लगावणे सुलभ जाणार असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. या मतदारसंघातील निवडणूक वाहतूक कोंडी, माघारी गेलेले प्रकल्प, पाणीप्रश्‍न, बैलगाडा शर्यत आदी प्रश्‍नांवर रंगणार असून या प्रश्‍नांना आढळराव कसे टोलावतात व कोल्हे आणखी कोणत्या आश्‍वासनांचा पाऊस पाडतात, हे पाहणे औत्स्युक्‍याचे ठरेल.

दरम्यान, खेड विधानसभा मतदासंघात गेल्या काही वर्षांत भाजपनेही आपली पाळेमुळे घट्ट केली आहे. युतीमुळे शिवसेना उमेदवारास भाजचेही बळ मिळणार आहे. मात्र, येथील भाजपचे कार्यकर्ते खासदार आढळराव पाटील यांना पूर्ण ताकदीने मदत करणार की तटस्थांची भूमिका बजावणार हे येणारा काळ ठरवेल. कारण, मुंबईत युतीच्या नेत्यांमध्ये दिलजमाई झाली असली तरी, कार्यकर्त्यांना ती मान्य असतेच असे नाही; परंतु एकनिष्ठ कार्यकर्त्यांस पक्षनिष्ठेपुढे काही दिसत नसल्याने तो मजबुरीने का होईना पक्ष आदेश पाळतो. अशीच काहीशी परिस्थिती खेड विधानसभा मतदारसंघात आहे. तर आमदारकीसाठी हा मतदारसंघ भाजपने घ्यावा अशी कार्यकर्त्यांची सुप्त इच्छा असली तरी त्यांनी कधी बोलून दखवलेली नाही. त्यामुळे ही सुप्त इच्छा मनात ठेवून ते खासदार आढळराव पाटील यांना पूर्ण ताकदीने मदत करणार की दिखावा म्हणून 'आप आगे बढो…' असे म्हणणार हे आगामी काळच ठरवणार आहे.
खेडमध्ये शिवसेनेला भाजपाची साथ मिळणार? खेडमध्ये शिवसेनेला भाजपाची साथ मिळणार? Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 22, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.