Seo Services
Seo Services

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना कचऱ्याचा गुच्छ भेट



पिंपरी : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड महापालिकेची तिसऱ्या वर्षी देखील घसरण झाली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकाळात 'बेस्ट सिटी'ने गौरविलेल्या शहराचा भाजपने कचरा सिटी केली आहे. याला सत्ताधारी आणि प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना कचऱ्याचा गुच्छ भेट देऊन अनोख्या पद्धतीने निषेध केला.

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आयुक्त हर्डीकर यांना गुच्छ आणि निवेदन दिले. यावेळी नगरसेवक विनोद नढे, संतोष कोकणे, राजू बनसोडे, नगरसेविका विनया तापकीर, माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर उपस्थित होते.


  • आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रवादीच्या कार्यकाळात पिंपरी-चिंचवड शहराला स्वच्छतेबाबत 'बेस्ट सिटी' पुरस्कार मिळाला होता. परंतू, भाजपची सत्ता आली अन्‌ जे शहर महाराष्ट्रात नंबर वन आणि देशात नवव्या क्रमांकावर होते. ते शहर सन 2017 मध्ये 72 व्या स्थानी गेले. तर, सन 2018 मध्ये स्वच्छतेबाबत 43 नंबरवर गेले.


  • आता परत सन 2019 मध्ये 52 व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. स्वच्छता अभियानाच्या फक्त जाहिराती सुरु आहेत. परंतु प्रत्यक्षात भाजपचा आणि आपला कारभार नियोजन शून्य आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे केवळ मलई खाण्यावर लक्ष असल्यामुळे अद्याप कचऱ्याची समस्या गंभीर झालेली आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कचरासुध्दा सोडला नाही. त्यामुळे त्यांनी शहराचा कचरा करुन टाकला आहे. बेस्ट सिटीची भाजपने कचरा सिटी करुन टाकली आहे. भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे शहरात सर्वत्र कचऱ्यांचे ढीग साठले आहेत. कचरा विलनीकरणाचा बोजवारा उडाला आहे.


  • स्वच्छ भारत अभियांनातर्गत स्वच्छ शहर सर्वेक्षणात राष्ट्रवादी कॉग्रेसच्या काळात तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांच्या कार्यकालामध्ये पिंपरी-चिंचवड शहर स्वच्छतेमध्ये राज्यात प्रथम क्रमांकवर होते. तर, देशात 9 व्या क्रमांकवर होते. शहरावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष होते. शहराचा विकास हा भविष्यातील 30 वर्ष डोळ्यासमोर ठेवून केला आहे.


  • शहरातील स्वच्छतेवर जास्त लक्ष देऊन शहराचा चेहरा मोहरा बदलला. त्यामुळे शहराला बेस्ट सिटी पुरस्कार मिळाला होता.परंतु, भाजपच्या राजवटीत शहराची सर्वच बाबतीच पिछेहाट झाल्याचा आरोप साने यांनी निवेदनातून केला आहे.
    महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना कचऱ्याचा गुच्छ भेट महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना कचऱ्याचा गुच्छ भेट Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 11, 2019 Rating: 5

    No comments:

    ads 728x90 B
    Powered by Blogger.