भोसरी : भोसरीतील नगरसेवकांनी आढळराव यांचा प्रचार करण्यास नकार दिला. दरम्यान, आमदार महेश दादा लांडगे यांनी युतीची भूमिका पार पाडण्याची सूचना आपल्या समर्थकांना केली.
खासदार शिवाजीराव आढळराव यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर तातडीने भोसरीतील भाजप नगरसेवकांची बैठक झाली आहे. आमदार महेश दादा लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, माजी सभापती सीमा सावळे, नगरसेवक विकास डोळस यांच्यासह भोसरीतील सर्व आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते.
भोसरीतील प्रत्येक प्रकल्पाला खासदार आढळराव यांनी विरोध केला होता. सुलभा उबाळे यांनी देखील सातत्याने आमदार महेश दादा लांडगे यांना टार्गेट केले. खोटेनाटे आरोप केले. आता त्यांचा प्रचार कसा करायचा? लोकांसमोर त्यांच्यासाठी मत मागायला गेल्यावर लोक प्रश्न विचारतील. आमच्या नेत्यांना सातत्याने पाण्यात बघितले जात असेल तर आम्ही प्रचार कसा करायचा ? असा सवाल नगरसेवकांनी केला. तसेच आढळराव यांनी अगोदर केलेले सर्व आरोप मागे घ्यावेत. महेश दादांना विश्वासात घ्यावे त्यानंतर आम्हाला प्रचार करायला सांगा अशी भूमिका नगरसेवकांनी घेतली.
भोसरीतील नगरसेवकांनी आढळराव यांचा प्रचार करण्यास दिला नकार
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 24, 2019
Rating:
No comments: