Seo Services
Seo Services

आचारसंहितेचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कामकाजावर परिणाम


Image result for पिंपरी-चिंचवड महापालिकेचे


पिंपरी : लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कामकाजावर परिणाम पडला आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक कामासाठी नियुक्त केले आहे. त्याचा परिणाम सर्वसाधारण सभा आणि स्थायी समिती सभेत जाणवला. सर्वसाधारण सभेला केवळ सहा अधिकारी आणि प्रमुख नगरसेवकांची हजेरी होती. अधिकारी व पदाधिका-यांच्या अनास्थेमुळे महापालिका सभा पुढील महिन्याच्या २० पर्यंत तहकूब केली आहे.

महापालिकेची मार्च महिन्याची सभा बुधवारी होती. अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, नगरसेविका सुलक्षणा धर यांच्या मुलाला सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. श्रद्धांजलीपर भाषणे झाली. विरोधी पक्षनेते दत्ता साने म्हणाले, '' शहरातील रेडझोन, बोपखेल पुलासह संरक्षण विभागासंदर्भातील विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी पर्रीकर यांनी प्रयत्न केले. राजकीय वलय असले, तरी पर्रीकर शेवटपर्यंत सामान्य कार्यकर्ता म्हणून जगले. संरक्षणमंत्री असताना त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील प्रश्नांबाबत आग्रही भूमिका घेतली होती. पर्रीकर यांच्या जाण्याने राजकीय कार्यकर्त्यांची हानी झाली आहे.

सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ''सामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री, संरक्षणमंत्री असे उत्तुंग यश पर्रीकर यांनी मिळविले. मुख्यमंत्री असतानाही त्यांचे पाय जमिनीवर होते. प्रश्नांची जाण असणारा हा नेता होता. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी आपले साधेपणा सोडला नाही. कार्यकर्त्यांत मिळून मिसळून राहायला त्यांना आवडत असे. ''

महापौर राहुल जाधव म्हणाले, ''सर्वसामान्य कार्यकर्ता अशी शेवटपर्यंत मनोहर पर्रीकर यांची ओळख होती. मुख्यमंत्री, देशाचा संरक्षणमंत्री अशी मोठी पदे भुषविली. तरीही त्यांच्यातील कार्यकर्ता जिवंत होता.''

अधिकारी, पदाधिकाऱ्यांची वाढली अनास्था

आचारसंहितेचा महापालिकेचे कामकाजावर परिणाम झाला असून, सर्वसाधारण केवळ सहाच अधिकारी उपस्थित होते. तर ७० टक्के नगरसेवक अनुपस्थित होते. काही नगरसेवकांनी केवळ हजेरी लावून पळ काढण्यात धन्यता मानला. सभा पुढील महिन्याच्या २० तारखेपर्यंत दुपारी दीडपर्यंत तहकूब केली आहे.
आचारसंहितेचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कामकाजावर परिणाम आचारसंहितेचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कामकाजावर परिणाम Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 22, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.